श्रीजगद्गुरु महाराज सुखाचा दानी
श्रीजगद्गुरु महाराज। सुखाचा दानी २ ।
नांदतो सैह्यांचळ स्थळ निर्मळ पाहुनी ||धृ० ॥
ऋषी अत्रिपिता अनुसया जयाची जननी ।
तो पूर्णब्रह्म अवतार व्यक्तला अवनी ।
अतिशुभ्र उटी चंदनादी परिमळ भरुनी ।
रेखिला टिळामृतनाभिज मिश्रित करुनी ॥
तू प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा । तवपदी ठाव नित्यानी प्रभूवरा ॥
हे भक्त वत्सला ज्ञानधनाचा तरणी ।
अज्ञानतमी करी प्रकाश तव तेजानी ।
श्रीजगद्गुरु महाराज सुखाचा दानी
नांदतो सह्यांचळ स्थळ निर्मळ पाहुनी ॥ ॥