धन्य धन्य स्वामीया अवधूता योगीया मुनिवरा
धन्य धन्य स्वामीया अवधूता योगीया मुनिवरा ।
सकळ साक्षी तू असशी गुरूकुळा चीदृप चिन्मयवरा ||धृ०
पूर्णबह्म परधाम परात्पर मुनिरंजन अच्युता ।
भवार्णवी बुडता तारी तू संसृतीमूळ छेदका ।
भक्ततिल्लका अत्रिकुमारा वससी सह्यगिरी ।
सकळजना पावशी कृपाळा प्रेम देई झडकरी ।
अगम्य अगोचर अनाम गुणमय अगम्य पूर्ण कृपा ।
देववृंद मुनीवृंद चिंतीती पार नसे तव रूपा ।
बद्रिकाश्रमी तत्वज्ञान तू कथिसी योगीजना ।
स्नान काशीचे सारूनी राया आत्मतीर्थी भोजना |
मातापूर हे पवित्र स्थान निद्रेला वारीसी ।
प्रेम सुखाचा दुर्ग उभविला ठाव देई मजसी ।
चाल:- हे कल्पदृमा अनुपमा, संकष्टी पाव आम्हा ।
भव ऋषीकुलोत्पन्ना, सुंदरा प्रेमधामा ।
चाल:- दास तुझा मी ठाव द्यावया, विसरू नको प्रभूवरा ।
भक्तवत्सला ब्रिद तुझे हे वदती गुण गंभीरा ।
चाल :- हे अत्रिसुता गुरूदत्ता, पावसी जना अवधूता प्रभूवरा हे पापताप दैन्याते वारी, भव हरी दुःखाते प्रभूवरा करूणाब्धि करूणावंता हे प्रभो दयाघन त्राता प्रभूवरा । चाल:- कैवल्य सुखाचा धाम, आत्मयाराम सकळ जगतासी, सकळ जगताशी अमृत दास चरणासी प्रभूवरा ॥*॥