चतुर्दश श्लोक
छंद :- शिखरिणी
अनाथाच्या नाथा सगुण गुणवंता सुखकरा ।
ऋषीवंशाधिशा दुरीत - तम- नाशा दिनकरा ।
महाविघ्नमवंशा सकळही आशा तू पुरविता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥१॥
सदाचा मी आहे परमअन्यायामाजी बुजला ।
दुरात्मा दुष्कर्मी परि सकळही लाज तुजला ।
त्रितापापासौनी अमृत निजवाणी निवविता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥२॥
अनाचारी भारी अतिअनवाळक बाळक जरी
।ितण्डा बंडाचे मनि जननी काहीच न धरी
स्वसिद्धे हे ब्रिदे अपुली निजकर्णी परिसता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥३॥
अरण्यी एकाकी भयचकित वत्सासि असता ।
त्वरे धेनु धावे स्वकरुनी हंबारव परिसता ।
तसा तू कैवारी श्रम बहुत भारी चुकविता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥४॥
महागर्ते माजी विकळ सहजी बाळक पडे ।
अतिस्वासोच्छवासी विलपित बहु स्फुंदत रडे ।
कशी काढी माता निजकरही देउनि ममता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥५॥
पिहूं पीहूं क्रांते वदन वरुते चातक करी ।
विलापे आलापी भ्रमत गगनी चंचु पसरी ।
तयाचे आक्रोशे नवघन करी पूर्ण सरिता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥ ६ ॥
चकोरे अंगारे अशन करिता मासही भरे ।
अतिशीणे दुःखे भ्रमत गगनमाजि विचरे ।
तया शोके क्रान्ता हिमकर करी शीतलहिता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥७॥
निशीचे संचारे अगणित कल्हारे कुचमती ।
दिनेशा निशांती उदय करिताचि विकसती ।
तू माझा अल्हादा विकसित सदा पूर्ण करिता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥८॥
विशाळे आळापे खग पिलक जैसे नवसती ।
क्षुधातुरे फारे दुरीत तम चित्तास असती ।
तदा पक्षिणी पै सदय करुनी चंचू भरीता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥ ९ ॥
अऴक त्रितापे दहत वहिला त्वा निवविला ।
सहस्रार्जुनाचा वरद करुनि शिण हरिला ।
क्रीडा मेरुवाळा सतत अससि स्नान करिता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥ १० ॥
कृपेने स्थापिले मुळ पिठी च्यवनात्मजस्नुषे ।
दयाब्धि ! रामासि प्रकटसि कसा कावडी मीसे ।
जटिन्द्रासि होसी अवनिवरि तू मान्य करीता |
तू महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥११॥
भुकेलो केव्हाचा तव पदकंजी लोळण करी ।
श्रवे अंबु नेत्री तुज किव नये अझुइवरी ।
अतिस्तंभ स्वेदे स्वरगळित रोमा पुलकित ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥१२॥
सखा बंधु तूची धन सजन तूचि बहिनुली ।
निदानीचा तूचि जीवन मम तू पाव वहिली ।
कवी ओंकाराचा भव भ्रमणीचा शीण हरिता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥ १३॥
श्रीदत्तासी ऐसी चतुर्दश श्लोकी विनवणी ।
रुचे छंदामध्ये परमरस वाटे शिखरिणी ।
वदे ज्याची वाणी इच्छित मनि होइल पुरता ।
महाराजा श्रीदत्ता शरण तुज आलो अवधुता ॥ १४॥
इति कवी ओंकारमुनी विरचित चतुर्दशश्लोक समाप्त