लीळारत्नावली स्तोत्र
मार्गमूळा गुरुदत्ता, नमस्कार तुम्हा असो ।
देवा ! अमोघ दर्शन, अधुना एव देई जी ॥१॥
शंबलीति परागिरा, कानी माझ्या पडो प्रभो ।
चहुयुगी क्रीडणाऱ्या, प्रसीद प्रेम देई जी ॥२॥
फलेठाणी चक्रस्वामी, भवरोगास वैद्य जे ।
क्रीडुनिया कृपाळु पै, बीजे मातापुरा करी ॥ ३ ॥
दुराग्रही मी जाणुनिया, स्थानत्याग प्रभु करी ।
व्याघ्रवेष निमित्ताने, उभय शक्ती स्वीकरी ॥४॥
पराच्छादुनि अवराची, क्रीडा द्वारावती करी ।
सूर्पमार्जनी करुनिया, मार्गविद्यादि देउनि ॥ ५ ॥
दुःखकेरु फेडी देवो, गोमतीत निक्षेपिती ।
कऱ्हेकुंचकी बैसणे अन् विप्रभोजन मानणे ॥६॥
मृतश्वाना त्याजणे वा, वृषभास जीववणे ।
रवळेया गीतनिषेधी, वाराणस्याम् जनानयन ॥७॥
विझवूनिया चांदोवा, बोणे उच्छिष्ट सांगणे ।
श्राद्धगृही आरोगणा, तप्तक्षीर शमन कथा ॥८॥
कामाख्या सुगरणी वदणे, श्रीप्रभु भेटी लीळा ।
हट्ट कामाख्या निमित्ते, पुतरा प्रभु करी ॥ ९ ॥
अशा दोषापासुनिया, रक्ष रक्ष मां प्रभो ।
भृगुक्षेत्री पुरस्वीकार, जिये स्थानी विभु करी ॥१०॥
तेही माते दिसेना मा, मातापिता वनितादिक ।
कसे दिसतील दोषरूपा, थोर खंती मी जोडिली ॥ ११ ॥
सेवकही न दिसती ज्या, सेवादास्य प्रभो! तुझे ।
घडे कुठुनिया संभव, कणव काही न अर्जिली ॥१२॥
द्यूतक्रीडा निमित्ते पै, उदासीनत्व स्वीकरी ।
रामयात्रामिषे देवो, विदर्भासि बीजे करी ॥१३॥
श्रीप्रभुंच्या क्रीडा पहाता, सेंगुळ बुड्ड्या मिषे ।
ज्ञानशक्ती स्वीकरी तो, कार्य वैराग्य पै तिचे ॥१४॥
तेही अंगिकरुनिया, अवस्थेसहित प्रभु ।
कांतीकारा भेट देणे, तथाच पर्वती क्रीडा ॥१५॥
भिल्ला नि गोंडा तुझा योग, तसा मज मिळे कधी ।
तपस्येचे फळ मुक्ती, सिद्धी बोल्हाही लाधला ॥१६॥
आंध्रदेशी तैल्यकारा, लीळालाभ विलक्षण ।
विषयत्यागे चर्मकारु, स्थित्यानंदास लाधला ॥१७॥
जुवारी द्युतक्रीडेचे, रांधवणीचिया स्त्रिया ।
अद्भूत कणवा तयाचिया, मिया काही न जोडिले ॥१८॥
भले भाग्य त्या भक्ताचे, भक्ताच्या भगिनीचेही ।
भाऊ भवार्णवामाजि, भगवंतासह भेटले ॥१९॥
ओरंगली मल्लपूजा, उदार देव स्वीकरी ।
हेडाउवा दृश्य होई, राजपुत्राभास मिषे ॥२०॥
विज्ञापना ही त्यांची, मानुनी देई सन्निधी ।
पिता हंसांबिकेचा तो, थोर ब्रह्मादिकाहुनी ॥ २१ ॥
देवाधिदेव जामात, होउनिया गृही वसे ।
डाकरामस्थ व्याघ्रासि, विद्राविले जसे प्रभो ॥२२॥
तसे मम हृदयस्था, क्रोधव्याघ्रासि धाडिजे ।
चैतन्यादि सुरावरी, ऐश्वर्य ज्याचे सदा असे ॥२३॥
त्याचाही श्रीकरु तेलिणी, धरी कौतुक हे खरे ।
तीळ मारण्याचे पाप, तेलिये जणू क्षाळिले ॥२४॥
पंचकौळी ग्रहराज, उच्छिष्ट दाने मुंचला ।
कामनामे ग्रहो देवा, देही माझ्या सदा असे ॥२५॥
तयापासुनिया मुक्ती, उच्छिष्टे हो प्रसादय ।
घोडाचुडी शिष्यसांगात, सांडिला ज्या अक्रियेने ||२६||
कदापि ना घडो तैसी, प्रार्थना ही पुनः पुनः ।
भेटी पिवळतळौलीची, अपूर्वाद्भूत ती लीळा ॥२७॥
क्षेत्रखाजे आरोगण, दैवशाली मातंग तो ।
मातुल साधाबाईचे, दैवाचे रूपनायक ॥२८॥
अश्वावरी बैसवुनि, गेले घेउनिया गृहा ।
यजमान देवरायाचे, आगमिक पूजन जाणते ॥ २९ ॥
तसा योग घडावा हे, प्रार्थितो जी पुनः पुनः ।
व्याधभेणे ससा पळत, येता रक्षियला प्रभो ॥३०॥
भवाभेणे मीही पळत, नाभी नाभी म्हणा प्रभो ।
मासोपवासिनी बाई, सेंदुर्जनाख्य गावीची ||३१||
विषयानंदापासोनि मुक्ती लाधे जी तांबुळे ।
तैसे व्हावे मजलाही, प्रार्थितो जी पुनः पुनः ||३२||
बंधु तिचा भाग्यशाली, तैसे दैवही नसे मम ।
भोगरामीचा बडुवा, अथवा बोणेबाईया ||३३||
मनशिळे विप्र भेटे, तैसे दैवही नसे मम ।
भांडारेस्थ निळभट्टे, प्रपंच मळवत् त्यागिला ||३४||
दर्शनासवे सान्निध्य, उठी बैसीही युक्त ती ।
स्तुतीप्राविण्य तैसेच, मनोरथही ऊर्ध्वचि ।।३५।।
म्हणौनिया महापूजा, धानुबाईचिये गृही ।
स्वीकरीति पहा स्वामी, भाग्य तैसे कदा मिळे ||३६||
शिक्षापण पटीशाळा, पतन चाटयास सांगता ।
नांदियेडी देहत्याग, भांडारेकार करीति ॥ ३७॥
ऐसेया नीळभट्टाचा, पदरज न मिळे मला ।
देव कोठुन होईल, ऐसी चिंता जी वर्तते ॥ ३८ ॥
रानभेरीचे गोपाळ, राजवाहक अश्व ते ।
ज्ञानदेही कुमरत्व, राखिले त्यांनी जणू ॥३९॥
म्हणौनिचि देवरावो, आरोहण करीति पै ।
एकही जन्म मिया देवा ! ब्रह्मचर्य न राखिले ॥४०॥
करंट्याला दैव कैचे, गोपबाळा समान ते ।
चोंढी लपविले गोपाळ, कणव तैसीही नाहीच ॥ ४१ ॥
गोवारी ज्वरनिवृत्ती, करुनिया तयाचिया ।
मातेस केले पात्र, मातृत्वा प्रेमासही ||४२ ॥
तैसे पात्र करा मज, प्रार्थितो जी पुनः पुनः ।
खिरारिया नेत्रपाती, प्रसव नित्यचालीचा ॥४३॥
मोडोनिया असंताचे, डोंगरपर्वत नासले ।
हाणा मारा मला तैसे, विनंती परिसा प्रभो ॥ ४४ ॥
परंतु देवताहाती, कदापि नच देईजे ।
कळावी बिरवणी जैसा, प्रसव माझा प्रभो असे ॥ ४५ ॥
दैवराहाटीच्या पात्री, रसरूप मी होत असे ।
सुंदरा दाउनि श्रीमूर्ती, प्रसव माझा जी नासिजे ॥ ४६ ॥
अपूर्व खंतीचा जी, म्हणून प्रार्थी पुनः पुनः ।
पूर्वभवी त्या चोराने, आपत्काळीही साधका ॥४७॥
सांडिले नाही धैर्याने, कणव ऐसेनि उरविली ।
म्हणौनिचि देवराया! सोडविला सन्मानुनि ॥ ४८॥
सत्क्रिया जी ! ऐसीही, मला घडली नाहीच |
तस्करत्व मात्र थोर, मिया केले असे प्रभो ॥ ४९ ॥
भवबांदौडीत देवा ! पडिलो जी खितपत ।
सोडवुनि प्रेम देणे, याचनाही पुनः पुनः ॥५०॥
रानमार्गी रानम्हैसा, रागा क्रोधात रातला ।
कृपावलोकनाने तो, शांतविला तुम्ही प्रभो ॥ ५१ ॥
मार्ग तो जी! चालता पै, जाहला तैलागुनि ।
हृदयाच्या अरण्यात, अहं म्हैसा मस्तवाल ॥५२॥
मार्ग रोधी भक्तीचा तो, जाणतसा जी आपण ।
शांतवुनि तयाते जी ! भक्तीमार्ग खुला किजे ॥ ५३॥
ओखट्या या माणसाची, विनवणी जी मानिजे ।
वेठीलीळे अधिकार्या, कणव तेणेही उरविली ॥५४॥
म्हणौनिया क्षेत्रखाजे, देवा! आपण मानिले ।
द्विजगोरक्षणी लीळे, उद्दामभाषी विप्र जो ॥५५॥
राखवी गोधने देवा, कणव तेणेही उरविली ।
म्हणौनिचि दधीओदन, देवा ! आपण मानिले ॥५६॥
ऐश्वर्ये म्या ज्ञानदेही, स्वीया सेवा करविली ।
भवान्तरी मग पडता, नामधारक वेठिले ॥५७॥
प्रसव माझा वाढता जी, ज्ञानियासही शिणविले ।
शेवटी देवरायास, मिया वेठीस लाविले ॥ ५८ ॥
अशी खंती जोडिता जी ! कणव काहीच ती नुरे ।
सिंगणाचा कान्ह नमितो, सर्वेश्वरासि विस्मिते ॥५९॥
समलोष्टाष्मकांचन, भाव राउळी पाहुनि ।
सुसंस्कारा अशा मी जी ! मुळी नाहीच अर्जिले ॥ ६०॥
लाहासी अर्भकाते त्वा, खेळविले जाळीतळी ।
रोख हरिला लाहासीचा, कृपा तैसी जी वर्षिजे ॥ ६१ ॥
कुणी ठाकुर दैवाचा, पुत्रेषणा जी ! द्योतवी ।
तयाची वडिला भार्या, पुत्ररत्नास लाधली ॥६२॥
सोडवुनि प्रेम देणे, याचनाही पुनः पुनः ॥५०॥
रानमार्गी रानम्हैसा, रागा क्रोधात रातला ।
कृपावलोकनाने तो, शांतविला तुम्ही प्रभो ॥ ५१ ॥
मार्ग तो जी! चालता पै, जाहला तैलागुनि ।
हृदयाच्या अरण्यात, अहं म्हैसा मस्तवाल ॥५२॥
मार्ग रोधी भक्तीचा तो, जाणतसा जी आपण ।
शांतवुनि तयाते जी ! भक्तीमार्ग खुला किजे ॥ ५३॥
ओखट्या या माणसाची, विनवणी जी मानिजे ।
वेठीलीळे अधिकार्या, कणव तेणेही उरविली ॥५४॥
म्हणौनिया क्षेत्रखाजे, देवा! आपण मानिले ।
द्विजगोरक्षणी लीळे, उद्दामभाषी विप्र जो ॥५५॥
राखवी गोधने देवा, कणव तेणेही उरविली ।
म्हणौनिचि दधीओदन, देवा ! आपण मानिले ॥५६॥
ऐश्वर्ये म्या ज्ञानदेही, स्वीया सेवा करविली ।
भवान्तरी मग पडता, नामधारक वेठिले ॥५७॥
प्रसव माझा वाढता जी, ज्ञानियासही शिणविले ।
शेवटी देवरायास, मिया वेठीस लाविले ॥ ५८ ॥
अशी खंती जोडिता जी ! कणव काहीच ती नुरे ।
सिंगणाचा कान्ह नमितो, सर्वेश्वरासि विस्मिते ॥५९॥
समलोष्टाष्मकांचन, भाव राउळी पाहुनि ।
सुसंस्कारा अशा मी जी ! मुळी नाहीच अर्जिले ॥ ६०॥
लाहासी अर्भकाते त्वा, खेळविले जाळीतळी ।
रोख हरिला लाहासीचा, कृपा तैसी जी वर्षिजे ॥ ६१ ॥
कुणी ठाकुर दैवाचा, पुत्रेषणा जी ! द्योतवी ।
तयाची वडिला भार्या, पुत्ररत्नास लाधली ॥६२॥
दुर्भगेच्या दृष्टांतीचे, पुत्ररत्न मला हवे ।
दुःख तैसे मला नुपजे, म्हणून प्रार्थी पुनः पुनः ॥ ६३ ॥
राहिएर नगरस्थ, वामनपेंधी विप्र तो ।
विधुर झाला त्याची ती, ब्राह्मणी जिवविली जी ॥६४॥
सदाचारवृत्ती नामे, ब्राह्मणी मजला प्रभो ।
कृपेने जी! तुमच्याच, मागा प्राप्तली होती जी ॥६५॥
कुयोगसर्पदंशाने, मृतप्राया ती सांप्रती ।
स्मरण भक्ती पाणिपात्र, कैसे अर्पीन स्वामिया ॥ ६६ ॥
कृपावलोकन पीयूषे, जीववावी ही प्रार्थना ।
गोविंदनामे संन्यस्त, विष्णु गुरु कानवाथर ॥६७॥
तथापि स्थित्यानंदास, लाधला कणववशे ।
सदाचारी सुसंस्कृता, जीवा मी कानवाथर ||६८ ||
मागा होतो आता आहे, पालय पालय श्रीवर ! |
घुटिकासिद्धी विष्णुची, महदंबेस सांगणे ॥ ६९ ॥
मिया देवा! ज्ञानजन्मी, चमत्कार दाउनिया ।
अज्ञ लोका भुलविले, विष्णु झालो भवान्तरी ॥ ७० ॥
भावतीर्थी नांदियेडी, आंब गोड उच्चारणे ।
सर्व सामर्थ्य संपन्ना ! चरणारविंद दाखवा ॥७१॥
उभय वऱ्हाडिका करणी, अद्भूत वऱ्हाडी जाहले ।
अद्भूत सर्वच देवाच्या, केळी लीळा क्रीडा कृती ॥७२॥
सिद्ध रे सिद्ध वदुनि, द्योतवीसि कृपावशे ।
प्रसादे जी ! तुमच्याच, ओळखिजे तुम्हा प्रभो ॥ ७३ ॥
कृपा वोळो तशी स्वामी ! चातक कांदबिनीवत ।
बोल तुम्हा नसे देवा ! चातकत्व मलाच नसे ॥७४॥
स्वात्मरमण जो देवो, सीतस्याळाही स्वीकरी ।
उकिरडा श्वानगुंफे, सुषुप्तीस अंगिकरी ॥ ७५ ॥
संन्यस्तपक्ष जो स्वामी, द्वंद्वातीत निर्मत्सर ।भगवा
उद्ग्रहणिके, उभय पक्षास जैत दे ।। ७६ ।
जीव संलग्न दोघेही, जसे प्राप्तीस लाधती ।
अथवा श्रुती साच केली, सर्वभूतेष्वहं समः ॥७७॥
पराजित मठाधिपु, शोकसंतप्त जाहला ।
कुत्रचित् वृक्षमुळी, त्यास अदृष्ट दिसला ॥ ७८ ॥
ऐकुनिया तद्गाऱ्हाणे, यादवेंद्र द्रवें दया ।
पुनश्च विवादालागी, आज्ञापिती तया विभु ॥ ७९ ॥
पाठबळे दैवाचिया, मठाधिपु जय पावला ।
पूर्वील विजयी तव आला, विनत होउनि याचित ॥ ८० ॥
उचित त्यासही देउन, व्यवस्था श्रुती साचकृत |
समोऽहं सर्व भूतेषु, श्रुती येथेही वर्तली ॥ ८१ ॥
कुत्रचित् ग्राममार्गी, राजपुरुष शिबिका ।
पार्श्वभागुनि येता पै, पृष्टभागी श्रीमूर्तीस ॥ ८२ ॥
उद्धटे लोटिले एके, पाणिपात्र ते सांडले ।
सर्व ऐश्वर्यसंपन्न, सर्व समृद्धीवंत जो ॥८३॥
उकिडासनी बैसुनि, मार्गी शीतेही वेचिती ।
अधिकार्ये विनविताही, पाणिपात्र न सांडीच ॥८४॥
भिक्षान्न थोरी उमटवी वा, अधिकार्या उपेक्षिला ।
खंती जेणे तुम्हा येई, अशा न घडोत क्रिया ॥ ८५ ॥
कणवाथिला जीव कोणी, वृक्षयोनीस पातला ।
सान्निध्य त्याला देण्यास, प्रतिसंध्ये प्रभु येतसे ॥ ८६ ॥
असंगाला सवे कसली ! प्रवृत्तीने स्वीकार पै ।
रामदरणा नराधिप, तया वृक्षातळवटी ॥८७॥
ससैन्य घातला डेरा, सायान्हे प्रभुरागमत ।
तणाव्यावर श्रीचरण, ठेविता तंबू हालती ॥८८॥
अस्तित्व आपले देव, जाणवी सकळा जना ।
बाहिरी निगती सर्वे, आसनस्थ प्रभु दिसले ॥८९॥
चक्रवर्तीत्व अगाध, रामदरण्यास सांगती ।
बंबाळदिवा घे हाती, नराधिपु ही येत पै ॥ ९० ॥
दीपकाच्या प्रकाशात, श्रीमूर्तीस देखता ।
स्वामीत्व उमटले जीवी, संस्कार जागृत जाहला ॥ ९१ ॥
प्रार्थनि नेई स्वस्थानी, उचित सेवा स्वतः करी ।
मनोरथ मर्दना देता, कटकै परतो मागुती ॥ ९२ ॥
गावा नेईल देवाते, पुरला तेव्हाच मनोरथ ।
प्रार्थी देवा अळजपुरा, बीजे कीजो जी स्वामिया ॥ ९३ ॥
नगर बरवे वने बरवी, योग्य सिद्धा नि साधका ।
पूर्वदृष्ट आम्हा आहे, निरिच्छत्वास द्योतवी ॥९४॥
साग्रहे नृप पुढती, विनवी स्वामी राउळा ||
कुटुंबी जनास माझ्या, मातेस दर्शन देईजे ॥९५॥
मानिली प्रार्थना देवे, रामदरणा आनंदला ।
समर्पी गरुड घोडा, आणि अवघीच ओळग ॥९६॥
राजवाहक गरुडाश्व, आरोहुनि तयावरी ।
पेणोवेणा अळजपुरा, बीजे स्वामी तदा करी ॥ ९७ ॥
कदाचित गरुडा स्थिती, राजवार्ता नृपाप्रति ।
सांगती देवरावो पै, आगमन अळजपुरी ॥ ९८ ॥
मुहुर्ता अभावी तेव्हा, नगराबाह्य प्रदेशीच ।
अवस्थान त्रयरात्री, देवरायास जाहले ।। ९९ ॥
उत्साहे रामदरण्याने, मिरवत वाद्यादिकासह ।
शिबिकारुढे देवास, नगरप्रवेश करविला ॥१००॥
सडासंमार्जने शोभा, चौक रंगमाळिका ।
गुढ्या तोरणे मखरे, ओवाळिती सुभगा स्त्रिया ।। १०१ ।।
महाजनांच्या भेटी, मानणे राजिक्यापरी ।
भाट पवाडे पढती, वाद्यंत्राचाही घोष तो ॥१०२॥
उल्हासे राजमहिषी, राजद्वारी ओवाळिती ।
विविधा प्रतिती तेव्हा, विभुविषी जनमानसी ॥१०३॥
राज्ञगुरु कुणी माने, राज्ञजामात कुणी म्हणे ।
मालखाडा यादवेंद्रा, जसे पुरजन देखती ॥ १०४ ॥
मल्ला भासे वज्र उल्का, चक्रवर्ती नृपा गमे ।
वैरी मानिती काळ, स्वामी वाटे सुरगणा ॥ १०५॥
रतीकांत म्हणती रामा, ज्ञानी सर्वज्ञ बोलती ।
अनुसृत देवता मानी, विद्यावान पुरुष भासती ॥१०६ ॥
नंदादिकास वात्सल्य, सखा भावती गोवळे |
जनसामान्य देवाते, विशिष्ट भावेच देखती ॥ १०७ ॥
भक्त मानीतसे आत्मा, श्रेष्ठ प्रतिती त्याचीच |
असा विविधा प्रतिती, दृश्य होय प्रभु जना ॥१०८॥
तयामाजी मीच प्रसवी, दोष ईश्वरी कल्पितो ।
असो देव्हार चौकीये, अवस्थान मास दहा ॥ १०९ ॥
श्रीचरणी राजमाता, तुळसी भावे वाहिली ।
नेम घेतला तैहुनि, नमश्चक्रधराय ते ।।११०।।
तुळशी वाहिल्याविण, काही न घालीजे मुखी ।
अपूर्वा व्रतास आचरी, तैसे देवा घडो मज ॥ १११॥
नित्यदिनी लीळा तेथे, राजधर्मासह कशी ।
दुसरीया राज्ञीगृही, कधी सेवा स्वीकरीती ॥ ११२ ॥
आरोहुनि गरुडाश्व, वेदिके लाखारबनी ।
बीजे विहरणा करिती, सर्वत्रावस्थित विभू अंबिनाथा विडा वाहणे, चूर्णजाती निरुपिती ।
समृद्धी स्वामीसान्निध्य, सेवाभाव सुसंस्कृती
॥११३॥
॥११४॥
एकवटा या चहूचा, संसारी देवदुर्लभ ।
रामदरणेयास लाभे तो, मला लाभेल केधवा
॥११५॥
स्नेह पातळ जाणुनि, रामाचे काळांतरे ।
औदास्य स्वीकारे देव, एकाएकी बीजे करी
॥११६॥
सान्निध्य देणे कृपा जैसी, वियोग देणे कृपाच ती ।
रामदरणा गजबजे, शोधाशोधी बहुत करी
॥११७॥
सोमनाथी विभू ऐसे, वर्तमान तया कळे ।
लागवेगे प्रभुपाशी, रामदरणा येत पै
॥११८॥
उदासीनता देखुनिया, सामोरे न जाववे ।
भीत भीत नमुनिया, विनवी गृहासि न्यावया विनवणीच्या अस्विकारे, आरोगणेला प्रार्थितो ।
आरोगणा अन् पहुडा, स्वामी तेथेच स्वीकरी
रामदरणा गृही गेला, दोघे राखण ठेविले ।
॥११९॥
॥१२०॥
पुन्हा येरी दिसी आला, न्यावया प्रार्थना करी
॥१२१॥
अमान्य विनवणी होता, आरोगणेचे विनविले ।
दुःख देखुनिया त्यांचे, भोजनाचे मग मानिले
॥१२२॥
पुनश्च वसती तेथे, राखणाइत ठेउनि ।
रावो गृहासि जाऊनि, तिसरा दी ये मागुता
॥१२३॥
प्रसन्न देवा देखुनि, विनतकंदर होउनि ।
प्रणमौनि वदे दुःखे, का बा ऐसे उपेक्षिले
॥१२४॥
्रसन्नताचि पुसे देवो, याते जवळपासीच । बुद्ध्याचि राखते आहा, आणिले काय तुमचे !
राजाही तो बुद्धिमान, वदे उत्तर सुंदर
॥१२५॥
॥१२६॥
जी जी सर्वस्व आमुचे, देवा! आपण आणिले । पुनश्च रावो विनवी, देवो मान्य न करिती
॥१२७॥
तदा दुःखे विनवी राजा, जी जी मातेस माझिया । उपोषणे तीन पडली, तुळशी वाहियल्याविण
॥१२८॥
बीजे करावे तेथे जी, श्रीपादी तुळशी वाहून । करील पारणे देवा ! व्रत सुफळ होईल
॥१२९॥
स्वामी तयास म्हणती, मागुते तरी तेच की ।
वदे नृप जी जी स्वामी, अवघेया दिसाचेही
॥१३०॥
एक वेळे वाहातील, भवतः प्रवृत्तिर्यथा ।
तथा गच्छन्तु स्वामीन्, नमश्चक्रधराय ते
॥१३१॥
प्रसन्न होउनि देवे, विज्ञापना ती मानिली ।
नगरा आंतु बीजे केले, राजमंदिरा भितरी
॥१३२॥
मर्दना मार्जने पूजा, त्रिवडी मांजिठी स्वीकरी ।
राजमाता हरीप्रिया, श्रीपादास समर्पिले
॥१३३॥
देव म्हणति तिला बाई, व्रता ऐशा न घेईजे ।
कव्हणीकडे हे जाईल, तेव्हेळी काई कराल
।।१३४॥
आरोगणा गुळ्ळा वीडा, राममातेस पारणे ।
तदानंतरे तो राजा, गोसावीयास विनवी
॥१३५॥
निरोध मिया केला जी, महिमान न जाणता ।
विहार शय्यासनी वा, भोजनादि अवसरी
॥१३६॥
असत्कृतोऽसि भगवन्, पाल्योऽहं क्षमस्व प्रभो ।
स्वेच्छया तिष्ठन्तु वा, विक्रीडन्तु यथेच्छया
जी जी ऐसे काइ देवा ! अव्हेरिले आम्हा प्रभो ।साष्टांगे नमिले भूपे, दुसरा दी बीजे करी । कुकडाळे तळे एक, नैऋत्ये अळजपुरा
तेउते बीजे करीता, काटीये तळी आसन । त्रिवडी फाडुनि देवे, कटीमाथा दोन सुडे
कटीबंधन निर्मूनी, येर केली ती पोतुकी ।
राज्यवेष टाकुनिया, अवधूतत्व स्वीकरी तळ्याकाठी गोपाळात, बीजे करुनि बोलती ।
दुसी होईल हे तुम्ही, गोपाळ हो ! ग्राहिक व्हा
द्रव्य आमते नाही जी, ऐसे गोपाळ बोलती ।
दामोट्याचे करा दाम, चिंचोक्याच्या आसू करा
॥१४१॥
॥१४२॥
देव जाले व्यापारी अनू, जीव ग्राहिक जाहले ।
जीवासि व्यापारी बनवी, आपण ग्राहिक होतसे
॥१४३॥
कधी आरंभिला खेळ, नेणवे कवणासही ।
प्रवृत्ती विषयो होति, अनुभूती ते लाधती
उरले वस्त्र काही एक, त्याच्या चिंध्या करुनिया ।
गोफण बनविली देवे, बाबुळेवरी तिष्ठनि
॥१४५॥
गोफणिती भेलवंड्या, झा भोरडीये बोलत ।
करिता ऐसी क्रीडा, लीळा संबंध वर्तले
॥१४६॥
गोपाळ विनविती देवा, जी जी आरोगणा कीजे ।
सिदोरीया सोडुनिया, निवडक पदार्थ अर्पिले
सस्नेहे आरोगिता ते, द्वापरस्थ जणू जाहले ।
सांजवेळे वडनेरा, निद्रेलागी वटेश्वरा
॥१४८॥
राणा वदे कुचीटाळे, घातले देउळासि या ।। उपकरणे राखावेया, ऐसेचि करणे पडे
॥१४९॥
पैला देउळा आपण, बीजे कीजे वस्तीस जी ।
उत्तरेशरी ते रात्री, पहुड स्वामी स्वीकरी
।।१५०॥
एरीकडे गुरुवास त्या, मध्यरात्री आठवले ।
धाडिले गोसावीया जेथ, दोन सर्प असती तिथे
॥१५१॥
वसू न देती कोणास, अहा ! आता कैसे कीजे ।
सांगावया निघे तवं, वेसी बंधन लागले
॥१५२॥
मागुता गृहा आला पण, चडफडी निद्रा न ये ।
झुंजूरका राणा आला, चौकी स्वामी तवं दिसले
॥१५३॥
प्रणमे पाद वंदोनी, चुकी माझी जी जाहली ।
विसरला मी सांगाया, भुजंग येथे राहती
॥१५४॥
अंगुळी अनुकारेसि, देव त्याप्रति बोलिले ।
होय असति दोन सर्प, रात्रौ दोघेही भांडले
॥१५५॥
उरावरी एथ पडले, तो गुरवु तदा पुसे ।
जी जी केले तरी काय? उवाच श्रीभगवान् तदा
॥१५६॥
उरी पडे त्या काय कीजे ? टाकिले दोन्ही दो करे ।
विस्मित पुसतसे राणा, गंतव्य कवणीकडे
॥१५७॥
आंबजैये गमनाची, प्रवृत्ती जाणवी तदा ।
वसू न देति सुविचारा, निर्वेदादि चतुर्विधा
।।१५८।।
रागद्वेष तोखरोख, भुजंग हृदयी मम ।
धाडिजे त्या विखारासी, विनंती ही माना प्रभो
॥१५९॥
वटेश्वराचे कठिये, राम गुरवप्रेरणे ।
आंबजैये येते जाले, देवरायास शोधत
॥१६०॥
वटवृक्षाचिये शाखे, लोंबता श्रीचरणी आसन ।
रामे वंदिले चरण, मग आसन रचिले
॥१६१॥
आसनी बैसले स्वामी, रामु विनतकंदर ।
स्थितीसुख कृपावलोके, प्रभु रामास संचरी
॥१६२॥अभ्यर्थना दादोसाची, मानुनि दधी ओदन ।
स्वीकरी देवरावो पै, अवस्थान वटेश्वरी
॥१६३॥
वासनिये वंकनाथी, वसति एक जाहली ।
विप्र कोणी दर्शना ये, मुक्या पुत्रासह तिथे
॥१६४॥
कनवाळु पुसे त्यासी, काय तुम्ही इथे असा ।
जी जी राहो करी सेवा, आल्या गेल्या नि राहत्या ॥१६५॥
गया वाराणसी गेलो, काम्य व्रते आचरलो ।
तथापि पुत्रा वाचा, दैवतीही न दिधली
॥१६६॥
कृपावंते तया पुत्रा, अवलोकुनि पुसले ।
कस्त्वं वद ! पिता कस्ते ! जननी च का तव
॥१६७॥
सारंगोऽहं ! तात महिपाल ! माता त्रिपुर आईसा !
मुका पुत्र बोलू लागे, मातापिता आनंदले
॥१६८॥
उपहारा विनविले, राउळे मानिले तदा ।
साधकाच्या गुणान्मोदी, मीचि मुका असे प्रभो
॥१६९॥
गुरु वा गुरुभावंडे, वर्णिना मी कदापिही ।
तुमच्या स्तुतीस्तवनी, त्याहीहुनि विशेष मुका
1180011
मधुरा सत्या पथ्या च, वाणी नाही असा मुका ।
ऐशा मुक्यावरी देवो, कृपाळु काय वोळेल
मागुते वडनेऱ्यासी, आले सर्वज्ञनाथ पै ।
रामा वडातळी भेटी, वाळुके केली दर्शना
स्वीकरी दहीभात आले, प्रेतत्व मुंचे तत्पिता ।
गोपाळी वस्ती व्याळी, राम बोळवीत येत पै
पुसे दर्शन पुन्हा कोठे, विसै प्रांती संप्रधार ।
पातुरी ते स्मशान वस्त्र, स्वीकरी प्रेतत्व फेडण्या सांडिले अंत्यज बोंबी, प्रार्थिताही न घे पुन्हा ।
॥ १७१ ॥
॥१७२॥
॥१७३॥
॥१७४॥
आलेगावी वस्ती केली, पव्हे रामास भेटणे
।।१७५।।
विसै विप्रस्य वरण ओदन, रामाहातीही स्वीकरी ।
अंजनीये वस्ती करून, मेघंकरासि येत पै
॥१७६॥
सोंडियेवरी देवो, बोणेबायांनी देखिला ।
वेधमूर्ती ती लोभस, लावण्यगुण सागर
।।१७७ ।
देखुनी विस्मिता वदती, कोणाची कुसी उसासिली । को भवान्! कुत आयात! मन्ये मौनदेवोऽसि च विदर्भादागतोऽसीति, अनुकारेचि संमती ।
मोदक प्रसाद करुनि, आप्तत्वा मानी त्यांचेया
॥१७८॥
।।१७९॥
गुरव निषेधे बाणेशा, त्यजुनि भैरवी वास करी ।
काचित् रात्रौ जुवाऱ्यांचा, उपद्रो श्रीकंठी नखे
॥१८०॥
सकाळी बाइया पुसती, मौन्य भंगूनि सांगती ।
बोणेबाया अभ्यर्थनी, मग बाणेशरी अवस्थित
॥१८१॥
कुण्या रात्री चोर एक, गुंफे बोणेबायाचिये ।
रिगे अवचिता नेई, मात्रा सर्वही आंगणी
॥१८२॥
मोट बांधे एरीकडे तवं, बाया कवाड लावुनि ।
बोबाती धावा धावा बा, मौन्यदेवाऽम्ही लुटलो
॥१८३॥
बाहिरी येऊनि देवो, इखित खाकरी तेधवा |
तस्करु मागे पाहे तो, विज्ञानमूर्ती विवर्धित
।।१८४।
आक्रित देखुनी भयाभीत, मात्रा सांडुनिया पळे | बोबाता का ? बाहिरी या, बायाप्रति
प्रभु वदे
॥१८५॥
हर्षिता बाहिऱ्या येती, काय गेले ? प्रभु पुसे ।
बाया म्हणती मौनदेवा ! सर्वच गेले काही नुरे
॥१८६॥
पाहाति तो आहे सर्व, जाडी त्याचीच राहिली ।
चोर नागवे उरफाटा, बाया पुसती कथं पळे
।।१८७।।विज्ञानचरित सांगे अद्यप्रभृति न येच तो ।
जुआरी तस्करा ऐसा, प्रसव माझा भजत असे कृपाळो ! कृपा करुनि, कर्षा कापट्य कुमती ।
गोकुळाष्टमी पर्वी ते, बोणेबायास स्वामीजी
।।१८८ ।।
॥१८९॥
द्वापरस्था देवाचिया, बाळरूपास दाविती ।
धन्य बोणेबाइया त्या, धनको देवासि जाहल्या
॥१९०॥
व्याजात फळ मातृत्वाचे, मुदलात प्रेम पावती ।
योग ऐसा देई देवा ! नमस्ते परशंभवे
॥१९१॥
मार्कण्डा विहिरीकाठी, ब्राह्मणी कुणी एक ती ।
सप्त घटासि श्रीकरु, देवाकरवीही लाववी
॥१९२॥
नंतरे तिच्या भ्रताराने, देवासि घरी आणिले ।
ओसरी बैसता देवो, भर्तृ आज्ञा ये बाहिरी
॥१९३॥
देखुनि हेळबुद्ध्या ती, पूर्वकृती सांगे स्वीया ।
कोपुनी ब्राह्मणे तीते, दंडवतादि करविले
॥१९४॥
हेळिले ज्ञानिये भक्त, अवज्ञा तुझीही करी ।
ऐसेया अपराधाची, क्षमा किजो जी स्वामिया
॥१९५॥
सामान्यस्त्रिया हाटी, भेटल्या दोघी जणी ।
विनउनि एकी घरी नेले, तांबुळासि समर्पिले
॥१९६॥
एकीचा ऐसा भावो जो, देवा कधी न मानवे ।
एकीचा ऐसा भावो जो, अविक्रियास मानवे
॥१९७॥
तुम्हा न मानवे देवा ! अंतरी ते कधी नसो ।
तुम्हास मानवे ते जी, हृदी माझ्या सदा असो
॥१९८॥
महीषा युद्ध निवारणी, जना आश्चर्य जाहले ।
मेघंकरस्थितं देवं, चित्परं तं नमाम्यहम्
॥१९९।।
सोमवारिये लोणारा, जाणे बोणेबायासवे ।कुमारेश्वरी आसन, धारे श्रीचरण घालणे
॥२००॥
दैत्यसूदना वायव्ये, मठी वस्ती आरोगणा ।
देवालागी आंगी टोपी, बोणेबाया सिवविली
॥२०१॥
उशीरु जाला निगता, श्रम स्विकरी मार्गी पै ।
नावेक आसन पुन्हा चाले, वाटे तस्कर भेटले
॥२०२॥
कुमती त्यांची हरिली, विडा त्यासी मग देववी ।
मेघंकरी पुनरागमन, चक्रेशः शरणं मम
॥२०३॥
सिंहस्थ आला म्हणुनी, बोणेबाई म्हणितले ।
त्र्यंबकासि चला देवा! अभ्यर्थना तद् मानिली
1120811
आलंबन न मने देवा, नदी उपानहौ सांडिल्या ।
बोणेबाई मागुत्या आणी, लक्ष ठेविती प्रतिदिनी
॥२०५॥
मार्गी प्रतिदिनी बोणे, वेधाचार्याय ते नमः ।
रावसगावी पाणीभात, बाबुळशेंगाऽरोगण ।
महादेव पाठकाच्या, कणवा क्षुधा स्वीकरी
पेणोवेणा प्रतिष्ठाना, पव्हेयासमवेत राउळ भोगावती आसनस्थ, बाया वदती चला प्रभु ।
प्रभु त्यास पै म्हणती, बाई तुम्ही चला पुढे मागिलाकडौनि येऊ, तुम्हा चोजवीत शोधीत ।
नागांबिकेच्या गुंफेसी, सख्ये बाया गेल्या तदा
विज्ञान चरिते देवाची, वर्णिली सर्व तिजप्रति ।
येरीकडे अमरघाटी, देवे क्षौर करविले ।
॥२०६॥
॥२०७॥
॥२०८॥
॥२०९॥
वेध संचरे नागमाते, बाया बिढारासि गेलीया
॥२१०॥
एक म्हणती या प्रसंगी, सकळ अवतार मिनले
॥२११॥
श्रीदत्तात्रेय देव आणि, श्रीप्रभु मुख्य बोलती ।
कलौ आचार्य व्हा तुम्ही ! समळा जीवास उद्धरा
॥२१२॥जीवोद्धरण कामीठा, सर्व मिळूनि घालती । प्रतिष्ठानस्थितम् देवम्, नमश्चक्रधराय ते
॥ इति श्रीलीळारत्नावली स्तोत्र संपूर्णम् ॥