चरित्र आबाब
अथ चरित्र आबाब
नमो दत्तात्रेया : नमो कृष्णराया
नमोजी स्वामीया : श्रीचक्रपाणी ॥१॥
नमो प्रभुराया : नमो पुरधार्या
लीळा तयाचिया : वर्णितसे ॥२॥
प्रथम आरंभी : लीळेची शोधनी
केली पुर्वजांनी : म्हाइंभटी ॥३॥
दुसरी शोधनी : परसरामांनी लीळेची करूनी : बंध केला ॥४॥
मग तिसरेन : शिवाचे शोधन मूरारमल्लान :चवथेन ॥५॥
पंचम शोधक : नृपतिभिदाख्य अंकुळनेरकर : ऋषित ॥ ६ ॥
ऐसें शोधकार : शर संख्या सार लीळेचे प्रकार : आइकावे ॥७॥
द्वापरीच्या लीळा : एकोणसत्तर सह्याद्रीच्या लीळा : संख्या सात ॥८॥
लीळा अज्ञातीच्या : गणित शंभर सा दशकावरी : वेद संख्या ॥९॥
पुर्वार्धाच्या लीळा : सातशे पन्नासआणिक त्यावर : ग्रहसंख्या ॥ १० ॥
त्यांत द्वारावतीच्या : वीस सांगितल्या एर आमुचिया : देवाचीया ॥ ११ ॥
उत्तरार्धाचिया : त्या अष्टशतक भैरव दशक : वरी सहा ॥ १२ ॥
चार शत वरी : अष्ट संख्या लीळा ऋद्धपुरीचिया : जाणाविया ||१३||
अवघीया लीळा : त्या युग्म सहस्र दोनशे नव्वद : वरी तीन ॥१४॥
लीळाचरीत्राचा : आबाब सांगेण नाव भिन्न भिन्न : वेगळाली ॥ १५ ॥
वसति पूर्वार्ध : ग्राम शत एक आणि सा दशक : पुढे नऊ ॥१६॥
सत्तरोत्तरार्ध : अवघी मिळूनीदोनशे एक उणी : चाळीसासी ||१७||
पूर्वार्धावस्थान : नऊ अधिक साठ उत्तरार्ध पाठ : बावन तो ॥१८॥
सोंडीवरी स्थित : पुराण संख्येन वृक्षातळी आसन : संख्या आठ ।।१९।।
सप्त संख्या नामे : वडासि आसने प्रसंगाप्रमाणे : आणिकही ॥२०॥
वस्ती अवस्थान : रहीत जी गावे चाळीसावरौते : वेद संख्या ॥ २१ ॥
उत्तरार्ध पूर्वार्ध : एकोणसत्तर पुन्हा पुन्हा गाव : विहाराची ॥२२॥
पूर्वार्ध उत्तरार्ध : विभू आसनस्थ आठावरी आठ : गणती ही ॥२३॥
तयांत पूर्वार्धी : सत्तर जाणावे अठरा या नावे : उत्तरार्ध ॥२४॥
चरणचारी उभे : ठाकणे देवाचे नऊ दशकासि : चार उणे ॥ २५ ॥
संबंधाच्या गुंफा : एकोणचाळीस वेष हे सव्वीस : बाबनाचे ||२६||
दांडी आरोहण : त्याची संख्या ब्रम्ह तुरूंगारोहण : शास्त्र संख्या ॥२७॥
पुष्टी आरोहण : समुद्र संख्येन डोणी आरोहण : गुण संख्या ॥२८॥
जलक्रीडा तीन : युग्म लपवणे तेरा बोधदाने : ईश्वराची ।। २९ ।।
दोन प्रेमदान : सर्पभक्त दोन भक्त एक श्वान : व्याघ्र पंच ॥ ३० ॥
वीस पै विज्ञान : दोन उत्पवन प्रकाशदर्शन : गुण संख्या ॥ ३१ ॥
दोन अदृश्य होणे : वेध एकतिस त्यांत तिर्यंचास : मास भेदी ||३२||
आश्चर्याचे तीन : पहुड असती पंधरा संख्या ती : तांबुळ दान ||३३||
महापुजा सात : व्यतिक्रम दोन पुत्र स्वीकरण : शास्त्र संख्या ||३४||
बोरे संख्या गुण : आंबे संख्या तीनकेळी प्रवेशन : ब्रम्ह संख्या ॥ ३५ ॥
मृत जीववणे : वेद संख्या जाण आरिख भाषण : बोल सहा ॥ ३६ ॥
औदास्य देवाची : दशम संख्येची शिक्षापण त्यासी : सदोतीस ॥ ३७ ॥
तयांत पूर्वार्ध : शिक्षापण सात तीसोत्तरार्धात शिक्षापण ॥३८॥
निर्वंश हे तीन : सहा दंडकरण सहा भेडवण : राज्य तीन ।। ३९ ।।
गायन आइकण : रूद्र संख्या जाण आपण गायन : गुण संख्या ॥ ४० ॥
गायन निषेध : गुणसंख्या भेद हिशोब प्रसिद्ध : वेगळाला ॥४१॥
आमच्या देवाची : लिंग संबंधाची पांडव संख्येची : जाणावी पै ॥४२॥
स्मरणी अवस्थाने : पर्वत संख्येन दो देवा मिळून : भेटी आठ ॥४३॥
तळे नमस्कारी : या दोही देवाची चोवीस संख्येची : संबंधाची ||४४ ॥
आमच्या बाबाचे : गाव संबंधिक सव्वीस दशक : वरी आठ ॥ ४५ ॥
श्रीप्रभुबाबाची : बेरीज वस्तीची गाव हे नेमाची : शर संख्या ॥ ४६ ॥
श्रीप्रभुंची गाव : संख्या तेहतीस संबंध विषेश : मान्य केला ॥ ४७ ॥
गावे वस्तीविण : अकरा प्रमाण त्रयोदश आसन : श्रीप्रभुंची ॥ ४८ ॥
मृत जीववणे : दशम संख्येन प्रकाशदर्शन : वेद संख्या ॥ ४९ ॥
एक ते औदास्य : अन् थापा हाणणे दो देवा मिळुनि : ग्रह संख्या ॥५०॥
अष्ट जया स्थिती : नव नाथ मुर्ती आणि लिंगाकृतीश्वर सोळा ॥५१॥
एकूणालिंगने देवा नि भक्ताची: संख्या आहे त्याची : एकतीस ॥५२॥
त्याचाची हिशोब : भटा सहा वेळा भेटी रूपाईला : वेळ आठ ॥५३॥
दादोसासि भेटी : दहाची गणत्री म्हाईंभटा भेटी : एळीयेचि ॥५४॥
आऊसा उपाध्या : द्वयेनालिंगन बारा प्रसंगेन : विविधा भक्ता ॥ ५५ ॥
मनोहर हास्य : त्यात भेद तीस इषित तयास : एकाधिक ॥५६॥
विनोदावसर : असति सप्तधा हर्ष चार भेदा: टाळी तीन ॥५७॥
विपलाणे एक : एकले कौतुक नवधा अभय : तोष नव ॥ ५८ ॥
खेळ चतुर्दश : तेच अवलोकन कोप, निराकरण : बावीसचि ॥५९॥
रूद्र चरित्रेन : संबोखिला आर्तप्रशंसेचे पात्र : बत्तीस ते ॥ ६० ॥
वरद वाक्य ते : एकोणीस देवाचे दशाधिक पंच : परिहास ॥ ६१ ॥
ग्रहो मुक्ती त्रिक : दीपन चौवेळ दुःखी पडीताळ : त्रयोदश ॥ ६२ ॥
दुःखासि निवृत्ती : तेवीस जनासि विखो प्रवृत्तीसि : चौघ जाले ॥ ६३ ॥
स्थितीदान सप्त : दशकावरि सा आणिक परिसा : वेगळाला ॥ ६४ ॥
भटा स्थिती आठ : दोनदा दादोसा माप नाथोबासा : पर्वताचा ॥ ६५ ॥
आउसासि तीन : चार दायंबासि आन पांडेयासि : दोची संख्या ॥ ६६ ॥
वाट ती पहाणे : समुद्र संख्येने बोलावू धाडणे : रत्नभेदी ॥ ६७ ॥
चिंता करी देव : पांडवाची संख्या सांधे रहावया : चौजनासि ॥ ६८ ॥
द्वय ते प्लवणे : द्वादश प्रेषणे शास्त्रभेदे वाणी : संभाषिली ॥ ६९ ॥
तृप्तकाम क्षुधा : स्वीकरी द्वयधा तृषाश्रमोत्कंठा : एकेकदा ॥७०॥
ऐसें गुणाकार : देवाचे चरित्र पुढा सविस्तर : ग्राम नावे ॥७१॥
आदौ फलेठाण : सह्याद्री शिखर द्वारावती थोर : वाराणसी ॥७२॥
भडोच नगर : अळजपुरासिदेऊळवाड्यासि : ऋद्धपुर ॥७३॥
तळेगावी वास : सालबर्डी नग काटोला सलग : आंध्रदेश ॥ ७४ ॥
पाळे देवठाणे : ओरंगलनगर डाकराम राहेर : नांदीयेड ॥ ७५ ॥
मग बळ्हेग्राम : दाभेरी काटसुर गोंडवाडा एर : सेंदुर्जन ॥ ७६ ॥
त्या भोगरामासि : मनसिळे तदा भंडारा नि मौदा : लिंबगाव ॥७७॥
नाळेश्वरी दान : लोणारी दर्शन हरणाळा रान : व्याघ्राचे पै ॥ ७८ ॥
देगाव अंध्रीचे : तो झाडी प्रदेश खेड हा विशेष : अष्टसिद्धी ॥ ७९ ॥
कुकडाळे तळे : वडनेर आन आंबजय वन : वासनी पै ॥ ८० ॥
वेळूवनि वास : टाकळी पातुर आलेगाव एर: घटाळी द्वय ॥८१॥
विसैये अंजनी : मेघंकरी स्थानी पुढा शारा वेणी : रावसगाव ॥८२॥
प्रतिष्ठान प्रांत : रहाटगाव ते कडेठाण तेथे : राजुरासि ||८३ ||
तथा लक्षपुरी सिंगणापुर की वाठवडा वाकी : पुर्णा नगर ।। ८४ ॥
त्या रामा साउरी : तळवेली वस्तीखैराळा पुढती : मालनजै ॥८५॥
बेलोरा शिराळे : तो टाकरखेडा आष्टी द्रव्यकथा : नायगाव ॥ ८६ ॥
माना ते कारंजा : मंगरूळपीर प्रशंसिला खेळ : तेथ देवे ॥८७॥
कोळगाव डोड्रा : फुलंब्री गदाना वेरूळी सुंदरा : नित्यवास ॥ ८८ ॥
इट माट खेड : लासुर घोगर देगाव ऐलाड : छिन्नपाप ॥ ८९ ॥
डोंबभिदान : सुराला नाउरी एसी वटेश्वरी : वावीचे ते ॥ ९० ॥
खोपडी सिन्नर : भोगूर नासिक गाव गोवर्धन : अंजनेरी ॥ ९१ ॥
त्र्यंबकाऽडगाव : सुकेणे निफाड ते खांडेभडाड : नांदुरासि ||१२||
कानळस चास : सुरेगावी वास सोनोरी विशेष : संवत्सर ॥ ९३ ॥
कुंकुमठाण ते : पुणतांबा नाव पुढा नायगाव : नाउरीये ।। ९४ ।।
हिंगुणी निवास : पुर्णगाव धोत्रे सांगव वांजरे : गावा नामे ।। ९५ ।।
नागठाण तपोवन : ते खातगव्हाण बादा, भामाठाण : नेउरगाव ॥ ९६ ॥
कानड बागड : ते जांबनगर गत म्हाळापुर : सुरेगाव ।। ९७ ।।
ब्राम्हणी काउळ : देउळाणा पुढं घोटण चापड : खरवंडी ॥ ९८ ॥
पारगाव कुण्डल : पिंपळ, कोळगाव पांगरीये ठाव : बीड, पाली ॥९९॥
पव्हे आसनस्थ : निंबा, पाटवधा साकत, सौताडा : मात्रकौळी ॥१००॥
आष्टी, पारगाव : सिराळा, वाकीसि मिरजगावासि : मांडौगण ॥ १०१ ॥
घोगर, अरण : ग्राम भिन्न भिन्न
भिंगार शेंडी अन् : डोंगर हे गण : वांबोरी सोनैये भालगाव होय : गंगापूर ।। १०३ ॥
त्या फुलशिवरी : वस्ती हातनुरी पुढा कनरडी : सायग्राम ॥ १०४ ॥
वाघळी कानसी : वडजैप्रदेशी भडगावपासी : पाचोरा ते ॥ १०५ ॥
सेंदुर्णी पिंपळ : गाव ते टाकळी पुढा चरवडी : चांगदेव ॥ १०६ ॥
नागापूर नसे : हरताळा पाळेपिंपळगाव ॥१०२॥
वसती टाकळी : सावळदेव ॥ १०७ ॥
जाईचे सुतीर्थ : वालसिंगीयेन चारू तपोवन : मासरूळ ॥१०८॥
अश्वत्थग्राम ते : ते भोगवर्धन सिल्लोड निल्लोड : आनवाबन ।। १०९ ।।
चारनेरग्राम : त्या करंजखेडीरामतीर्थ दाभाडी : हिवरळी ॥११०॥
काचराळा ग्रामी : ती खवनापूरी मग भाटेपूरी : गाडेग्राम ॥ १११ ॥
खैराडा करड : गाव ढाकेफळ देवता भुवन : साडेग्राम ॥ ११२ ॥
पुर ते भटाचे : अघविनाशन मिरजगव्हाण : जळगाव ॥ ११३ ॥
आगर नांदुर : नि गेऊरवावी बाग पिंपळगाव : खांबगाव ।।११४।।
श्रीपुरी गांधारी : डोंबल पिंपळ पुढा आपेगाव : बळ्हेग्राम ॥ ११५ ॥
रोकडां आसन : गुंफा महास्थान पांचाळ पट्टन : रम्यतीर्थ ॥ ११६ ॥
हिरण्यनगर : आंगलगव्हाण विंझुगा मायगाव : वडवाळी ।।११७॥
पिंपळ, बाभूळ : सविता त्रिगाव तो सदीप ठाव : जोगेश्वरी ॥ ११८ ॥
तो महासंगम : शिवना गंगेचा अंती पूर्वार्धाचा : खडकुली ॥ ११९ ॥
उत्तर गळनिंबे : सुरेगाव इंद्राचे संगम प्रवरेचे : गळनिंब ॥१२०॥
घटसिद्धनाथ : कोळेश्वर तेथे घुमनदेव ते : टाकळी भान् ॥ १२१ ॥
निधिवासेयासि : चाचरमुदीये रांजनी मिरीये : खांडेगाव ॥१२२॥
केळ पिंपळगाव : चिचोंडी नगरी ती मढीपिंपरी : पुढा देखा ॥ १२३ ॥
नारायणडोह : नालेगाव नेप्ती पारनेर लोणी : जांबगाव ॥ १२४ ॥
नागापुर नाउर : आव्हाना काउळ नि ममदापुर : टोकेग्राम ।। १२५ ।।
वाडेगाव खैराळी : रान जोगेश्वरी जवळनगरी : नागार्जुन ॥ १२६ ॥
आंबा व शेकटा : एळी हे भोकर खोकर बेलापूर : अंती पुरी ॥१२७॥
तयांत शेवट : जाणावे उज्जेन प्रमाण स्मरण : पाठ जाणा ॥ १२८ ॥
दोनशे अडसठ : गाव संबंधाची आमच्या देवाची : संख्या सारी ॥ १२९ ॥
आता एथुनिया : श्रीप्रभुंची गावहे मातुल हे ग्राम : ऋद्धपुर ।। १३० ॥
द्वारावती खेड : सोनोरी नानोरीत्या रामा साउरी : बेलोरासि ॥ १३१ ॥
अळज हे पुर : ती दाभविहीरा केशव द्विभार्या : गाव तिचे ॥१३२॥
अष्टजयांतुल : बोरज डोंबक देऊळ नामक : वाडा जाणा ।। १३३ ।।
माधान ती कोळ : विहीर अंतोरा सिराळा पुजदा : नांदीगाव ।। १३४ ||
रहाट आंजन : गावे आन आनइंद्राचे पाटण : माळधुरे ।। १३५ ।।
सेंदुर्जन तिवसा : भिष्णुर गोदरी आखत नगरी : सिरखेड ॥१३६॥
काटसुर आणि : तळेगाव इति ग्रामाख्य गणती : तेहतीस ॥ १३७ ॥
आमुच्या देवाचे : श्रीप्रभुबाबाचे तया उभयताचे : गाव झाले ॥ १३८ ॥
ही ती सारी गावे : तीन शत एक करा तुम्ही लेख : पाहुनिया ।। १३९ ।।
स्मरणी अवस्थाने : आठ मी सांगेन आठवा दुरून : एथुनिया ॥ १४० ॥
उज्जेनी सैह्याद्र : द्वारावती ठाव भरवसासि देव : ओरंगल ॥ १४१ ॥
भोगराम स्थान : विंझु गोंडवाडा आणि द्युतक्रिडा : आठ स्थाने ॥ १४२ ॥
इतुकिया स्थाना : जाए अनुसरला त्याचा बोध गेला : सत्य जाणा ॥ १४३ ॥
प्रथम दिवाळी : भोगनारायणी दुसरी करूनी : सिन्नरी पै ॥१४४॥
तिसरी ही बीडी : केली दीपावलीमग हिवरळी : चवथी पै ॥ १४५ ॥
गणपतमढी : दिवाळी पाचवी आणिक सहावी : निधिवासा ॥१४६॥
गणपतमढी : सातवी मागुती आठवी करीती : नागार्जुनी ॥ १४७ ॥
देवे राज्य केले : उभय गंगातीरी आठ वर्षे सारी : दीढ मास ॥ १४८ ॥
शके अकराशे : चौर्याण्णव देखा जाणावा श्रीमुख : संवत्सर ॥ १४९ ॥
आणि माघ मासे : शुद्ध चतुर्दशी सोमवार दिसी : बीजे केले ॥ १५० ॥
इतक्या काळात : देवे राज्य केले काय त्यासी जाले : दिनमान ॥। १५१ ।।
सातशे वरुषे : आणि बेचाळीसबीजे केले यास : काळ झाला ।। १५२ ॥
शके एकोणीशे: छत्तीसाचा नेमअसे हा विक्रम : संवत्सर ।। १५३ ॥
श्रीमुखापासौन: विक्रमापर्यंत पहावी गणित : काळ संख्या ।। १५४ ||
याचा गुणाकार : करेल चतुर न कळे सुमार : सर्वत्रासि ॥ १५५ ॥
गोसावीयां मागा : ते पै भटोबास त्या ऋद्धपुरास : गेले देखा ॥ १५६ ॥
चवदा वरूषे : श्रीप्रभुबाबापासि राज्य भटोबासी : केले तेथ ॥१५७॥
मग निंबेयास : आले भटोबास तेथे रहिवास : वर्षे सोळा ॥ १५८॥
बत्तीसा वरूषा : जाले अनुसरण त्यात सन्निधान : वरू चार ॥ १५९ ॥
अवघे मिळून : वरूषे सासटनागदेव भट्ट : होते तेथे ॥ १६०॥
त्या लीळादानाचे : केतुले आयुष्य वर्षे चवतीस : दिले देवे ॥१६१॥
मग विसर्जुनी : केला देह त्याग बोले भटमार्ग : आजवर ॥ १६२॥
शके हे बाराशे : चोवीस वरूषे शुभकृत त्यास : संवत्सरी ॥ १६३ ॥
मास भाद्रपदे : वद्य हो द्वादशीत्या काळी भटासी : देव आज्ञा ॥ १६४॥
श्रुती गोसावीयांची : स्मृती भट्टोबासाची परशरामाची :मार्गरूढी ॥ १६५ ॥
कविश्वर कमळाई : आणोबास जाणे या सर्वा मिळुनी : वृद्धाचार ॥१६६॥
आता पक्षकार : चोवीस सांगेन माळिका लक्षण : फुली स्तंभ ॥ १६७ ॥
कवीश्वरबास : मुनीबा ओंकार स्वमती पातुर : बासपक्ष ।।१६८॥
पंडिताचा पक्ष : आणि म्हाईंभट पक्ष फरपट : नागाइसे || १६९ ।।
घोंगडा अंकुश : करंडा दुरेघी रेघ हे चौरेघी : मुढा स्तंभ ॥ १७० ॥
परशरामबा : रामेश्वरबास शिवबा चोवीस: पक्षकार ।।१७१ ॥
स्थळे वाखाणिल्या : चोवीस पक्षांनी तया पूर्वजांनी : शिवबासी ।। १७२ ।।
दोनशे नव्वद : वचने आचार पंच्यांशी विचार : दोन शत ।। १७३ ॥
नवही प्रकरणे : श्रीमुखे दृष्टांत लापनिक त्यात : द्राष्टांतिक ॥। १७४ ।।
रत्नमाळा स्तोत्र : मुर्तीप्रकाश हे ज्ञाननिधी पाहे : कलास्तोत्र ।। १७५ ।।
तेचि नव गुढे : वेगळाले केले त्यात आठ गेले : एक असे ॥ १७६ ॥
पूजा अवसर : तिन्ही वेगळाली आवघी ही झाली : बंध तेरा ।। १७७ ।।
इतुक्या बंधासि : केशराजबासी संबंध तयासि : लावियेला ॥ १७८ ॥
नरेंद्रबासांनी : केला तो नरेंद्रऋक्मिणी स्वयंवर : कथा लागे ।। १७९ ।।
नामावली स्तोत्र : नीळांभोज पहा विरामशीळ हा : गीत देखा ॥ १८० ॥
साठ चौपदीया : ते वत्साहरण पंडितबासाने : संबंधिले ॥ १८९ ॥
द्वादश श्लोक हे : पूजावसर बोलिले निर्धार : राघोबासी ।। १८२ ॥
नरविलाप हे : स्तोत्र अमोलिक सत्तावीस श्लोक : शिशुपाल ॥ १८३॥
एकादश स्कंध : सात पाच श्लोक अष्टक आणिक : गुण संख्या ॥ १८४ ॥
श्लोक हे चाळीस : पूजावसरतिनी सविस्तर : वोवीबद्ध ॥ १८५ ॥
ऐसे आठ बंद : त्या कवीश्वरांनी केले संबंधुनि : मार्ग हेतू ॥१८६॥
काळ क्रिडा बल्हो : बत्तीस लक्षणे पोळले हे सुने : अंताक्षरी ॥ १८७॥
बारा चौपदीया : हे इतुकेयास ते पै आनोबास : बोलियेले ॥ १८८ ॥
आचार विचार : हे अर्थ वचने तिघाही मिळूनी : संबंधिले ॥ १८९ ॥
परसरामबा : रामेश्वरबासे आणि आणोबासे : ऐसे तिघे ॥ १९०॥
ऋद्धपुर महात्म्य : निर्वेद संकटीमहेश्वर भट्टी : दोनी केली ॥१९१॥
पाचा पुर्वेयाचे : केले मुर्तीज्ञान आणि निर्वचन : असतीपरी ।।१९२।।
चैतन्य मृत्तिका : दृष्टांत प्रमेय निर्वचन सये : चौरेघी ते ॥१९३॥
सरवळे चरित्र : या आदीया सहित आठा संबंधित : पक्ष तो पै ।।१९४ ।।
या नवा बंदासि : संबंध लावुनि परशरामानी : ज्ञान केले ॥ १९५ ॥
वस्त्रप्रसादाची : स्तंडेल बांधणी परशरामानी : केली देखा ॥ १९६ ॥
तयात आणिक : नखाचा विशेष दाढेचा हा ठिक : केला यत्ने ॥ १९७॥
दाढेचा विशेष : त्याचे केले पाच दिधले सर्वच : विभागोनि ॥। १९८ ।।
कुमर आम्नाय : रेमाईसे मुख्य तयासि विशेष : दिला होय ॥ १९९ ॥
दुसरा विशेष : नागाईसासि दिला त्या आनोबासाला : तिसरा तो ॥ २०० ॥
चवथा विशेष : पिढीसि ठेविला पाचवा चोरीला : सोनचोरे ॥ २०९ ॥
पाचवा मुळीचा : सोनारे चोरीला लासुरेकराच्या : घरा आला ॥ २०२॥
उरले परमाणू : त्याचा केला एक सहावा विशेष : दाढेचा तो ॥२०३॥
नखाचा दिधला : कमळाउसाला वाल्हेकर तया : म्हणताति ॥ २०४ ॥
इतुके करूनि : स्मृती पै केलीया परशरामाचेया : पाया वंदू ॥२०५॥
नाम दहा ठाय : रामेश्वरबासी संबंध तयासि : लावियेला ॥ २०६ ॥
वासुदेव भट्टी : साठी प्रश्न केले हयग्रीव बोलिले : गद्य देखा ॥ २०७ ॥
सन्निपात बल्हो : दुजे संचरण तिजे आत्मज्ञान : निर्वडीचे ॥ २०८ ॥
शरणांगताचा : त्या ऋषिशृंगाचा पेठे हरिबासाचा : संबंध हा ॥ २०९ ॥
ढोरीया डोंगरी : अचळ मुरारीकेली असतिपरी : कापुराची ॥२१०॥
कवि मालोबास : तेही मूर्तिज्ञान वृद्धाचार दोन : संबंधिले ॥ २१९ ॥
वाईंदेशकरे : ते पै न्यायंबासेत्या हेतू स्थळाचे : कर्ते झाले ॥ २१२ ॥
अचळाचा शिष्य : माहूर स्थळासि अन्वय तयासि : लावियेला ॥२९३॥
सुंदर लिपीही : सैह्याद्री वर्णने रवळोबासाने : संबंधीले ॥ २१४ ॥
कुमर आम्नाय : मुनीबास पात्र तेही स्थान मात्रे : ओटे केले ॥ २१५ ॥
ज्ञानप्रबोध हा : विश्वनाथी केला निर्वेद वर्णिला : दायंबासि ॥ २१६ ॥
बाहाळे ग्रामीचे : नारोव्यास तेणे केले ते वर्णन : ऋद्धपुर ।।२१७॥
शिव हे बासांनी : महावाक्य त्यांनी प्रमेय करूनी : असतिपरी ॥ २९८ ॥
वर्तेचे प्रमेय : प्रसादसेवेशी दृष्टांत स्थळासी : बोलियेले ॥ २१९ ॥
आचार विचार : लक्षण समस्त स्थळ हे समस्त : संचरण ॥ २२० ॥
लीळा साती रूपे : इतुके शोधून लाविले प्रसिद्ध : शिवबासी ।। २२१ ॥
आसने प्रतिष्ठा : वैद्या हो पासुनी भद्रे श्रृंगारूनि : बैसविले ॥
पालखी बैसन : मुनीबा पासुन दिली बादशहान : बेदरीच्या ॥ २२३ ॥
कैसे मुनीबास : संदेह तुम्हास कुमाराचा वंश : आमनाय ॥२२४॥
ऐसे शास्त्र वक्ते : अवघे महंतत्यासि प्रणिपात : केला मिया ॥ २२५ ॥
दत्तराज गुरू : त्याचा नाभिकारू मस्तकी श्रीकरू : ठेवियेला ॥ २२६ ॥
प्रथम आबाब : केला राघोबासी पिढीपाठ त्यासि : प्रमाणभूत ॥ २२७॥
घातली सुभर : नरेशांनी त्यात हेतू मुखोद्गत : करण्याचा ॥२२८॥
स्मरण पाठाचे : आबाब गहन वाढवी चिंतन : श्रीमुर्तिचे ॥ २२९ ॥
शके एकोणीशे: छत्तीस वर्षाचा विक्रम नावाचा : संवत्सर ॥ २३० ॥
नक्षत्रानुराधी : आषाढ या मासी बुध एकादशी : काव्य पुर्ण ॥२३१॥
मत्स्य सरीतेच्या : दक्षिणीली तीरी यादवनगरी : पद्य केले ॥२३२॥
बत्तीस दोनशे : ओव्या संख्याकार झाला संप्रधार : स्मरण्यास ॥२३३॥
इति चरित्र आबाब संपूर्ण