निर्वेद स्तोत्र
निर्वेद स्तोत्र
विज्ञानशक्ती अवतरले : बहुत दैत्य निर्दाळिले : विश्वरूप प्रकटुनि अर्जुनदेव बोधिले :
तया नमन श्रीकृष्णराया ॥ १ ॥
जो चहुयुगीचा अधिष्ठात्री : अमोघा सिद्धी जयाचा घरी : तो मातापुरी राज्यकरी : तया नमन श्रीदत्तात्रेया ॥२॥ जे अवधूत वेषे क्रीडा करीति :
सूपी पुंजे भरुनि गोमतीमध्ये घालीति :
बावना पुरुषा विद्यादान देति : तया नमन श्रीचक्रपाणि ॥३॥ आत्मारमणी रमती : नगरामध्ये क्रीडा करीति :
कृमीते ब्रह्मपदा नेति : तया नमन श्रीप्रभुराया: ॥ ४॥ जो शरणागता वज्रपंजरु : आर्ताचा उदारु : तो नमीन कृपेचा सागरु : श्रीसर्वेश्वरु: ||५|| जो भांडारी ब्रहाविद्येचा : सारथी वैराग्याचा : बाप आचार्यांचा : नमीन नागार्जुनु : ॥ ६ ॥ तया नागार्जुनाचा उपकारु :
म्हणौनि महानुभावी जाणितला विचारु :
ए ब्रह्मविद्येचा निर्धारु : नाही आणिके ठायी : ॥७॥ ईश्वरज्ञान निर्धारिता : भूल पडलीसे वेदान्ता : आणिकाही सिद्धान्ता: ठाउकचि नव्हे : ॥८॥ जे अन्यथाज्ञाने ग्रासिले : अभिलाषे बांधिलेते मायाजळी बुडाले : तेथ तृष्णा बहुत : ॥ ९ ॥ जेणे अहंकाराचा घोडा वळघला :
मानमान्यतेचा अभिलाषु वाढिन्नला :
तो पुरुष आचारे मैळला : तेथ ज्ञानाचा संदेहो : ॥ १० ॥ असो, एणेविण काइ राहिले : जे जयाचे हरतले : ते कव्हणीपरी निर्धारिले : ते विचारू आता ः ॥११॥ आचार कीजे मागाडा : निर्वेद बाहिया सवंगडा : अनुताप रोकडा : उजळता दावी : ॥ १२ ॥ निर्वेद कमळिनी विकासु : साधनी नाही अभ्यासु : तरी झाडेसि करावा सहवासु : निरंतर पै : ॥ १३॥ जेणे काम क्रोधाते निर्दाळिले : उपाधीते दवडिले : सर्व सुखाते सांडिले : ज्ञानाचेनि बळे : ॥ १४ ॥ जयाचे अज्ञान निरसले : अन्यथाज्ञान फिटले : ज्ञान प्रकाशले : चहु पदार्थांचे : ।। १५ ।।
:
एक एक पदार्थ विस्तारिता : पर्वत न पुरेचि लिहिता आवाका परिसावा जाणता : तोकडेयामाजि : ॥१६॥ जेणे ईश्वर धरिलासे मनी : तया सुख नाही साधनी : अप्राप्ती भावी असन्निधानी : नाश होए कर्मांचा : ॥ १७ ॥ जैसे चंद्रेविण चकोरासि : मेघेविण चातकासि : कांतेविण विरहिणीसि : सुखचि नाही : ॥ १८ ॥ ना तरी मायेविण बाळकासि : उदकेविण मीनासि : तैसे देवेविण भक्तासि : उरणेचि नाही : ॥ १९ ॥ जी हे देह उरावयाचे हेचि कारण : जे असन्निधानी झाले श्रवण :
परवस्तुचे सादूषण : थोर होतसे : ॥२०॥जरि देतासि आपुलिए भक्तीते :
तरि तुजविण माझे देह न उरते :
ज्ञान कोरडे देखते : तेथे प्रयत्न थोर : ॥२१॥
जी जी तैचि जर अनुसरता : तरि ए सृष्टीमध्ये न उरता : साधनेकरुनि साध्य पावता : तुमचिए स्वरूपी : ॥२२॥ जी तू सकळ गुणाचा गुणवंतु : मी सकळ दोषांचा दोषवंतु तुझा मुरडुनी जाए हातु : निरयाकडे : ॥२३॥
:
ऐसा मी अपराधी ओखटा : तुझा सांडुनी जाए दारवंठा : यमदूत नेउनि घालीति ताटा : विचंबीति अनेके परी: ॥२४॥ ऐसा मी कृतघ्न : तूते जाए सांडुन
:
रिणाइत नेति धरून : चहुं वाटा : ॥ २५ ॥ः जी तू न उबगसि सृष्ट्यानुसृष्टी ज्ञान देता : परि मज वेळ न लगेचि धाडिता :
आता कृपा करीसि की न करीसि ही चिंता : थोर वर्ततसे : ॥ २६ ॥
जी मी कव्हणे सृष्टी म्हणितले न करीचि तूझे हे थोर अनुचित माझे :
:
आता सेवक म्हणता न लाजे : तरी स्वामीदुऱ्हा तो कव्हण : ॥२७॥ जी तू स्नेह करीसि अनादिचे
:
परि मी सन्निधान न करीचि तुझे :
आता हृदय न फुटेचि माझे : तूंते विनविता : ॥२८॥
परि ए सृष्टीमध्ये पाहता : आणिक कोणी नाही रक्षिता : आपुलाला वेळु घेति देवता : सेवटी दवडुनि घालीति : ।। २९ । तैसा तू नव्हेसि निष्ठुरु : तुझेनि पाडे आणिक नाही उदारु : जीवाते तारीसि भवसागरु : कृपाळूपणे : ||३०||ुझेया श्रीचरणां भजावे : तुजचि शरण रिगावे : तुझेचि दास्य करावे : जन्मपर्यंत : ॥ ३१ ॥ आता माझेया सर्व दोषाते फेडावे : आपुले सेवादास्य द्यावे :
दैवरहाटीमाजी घालावे : अनाथ म्हणौनिया : ॥३२॥
जी मी संसारे त्रसला :
म्हणौनि तुज शरण रिगाला :
तुझे वचन जीवेसि धरुनि ठेला : आता ठाके ते करी : ॥३३॥ म्हणति प्रमाणपुरुष : साधनी पाहिजेल सुख :
तरी ये संसारीचे दुःख : नासेल कव्हणेपरी : ॥ ३४॥ ईश्वराकारणे शरणांगते : परित्यजावे सर्व धर्माते : मग अप्राप्तीचेया दुःखाते : अर्जावे तेणे : ॥ ३५ ॥ ईश्वर स्मरावा चित्ती : जो अव्यक्त आलासे व्यक्ती : तोचि नेईल प्राप्ती : आनंदस्वरूपाचिया : ||३६|| नागार्जुनाचा स्वामी एक वेळ भेटता :
तरी जीवेसि धरुनि ठाकता :
केव्हेळाही न सोडता : श्रीचरण तयाचे : ॥३७॥ तरी आता काइ कीजे : हे पंचभौतिक ईश्वरा दीजे : मग जीवे स्तुति कीजे : देवरायाची : ||३८|| जी तू सकळ जीवांची माउली :
मनुष्यवेषाची कुपरी साहिली :
ज्ञानशक्ती स्वीकरिली : आर्ता लागी : ॥३९॥ मायावेष धरुनि : उभयशक्ती स्वीकरौनि : पाहातसे द्यावया लागुनि : चारी दाने : ||४०|| आता सात्विके स्थानी बैसोनि :तो देव हृदयमंदीरा आणौनि ::
तप चंदनाचा रेखुनि टीळा : मन-मोगरीया परिमळा आवडीचिया कंठीमाळा : ओळगवाविया ॥५०॥ धुपटना देहाचा : अंगारा विरहाग्नीचा : धूप ज्ञानेंद्रियांचा : उधळावा : ॥ ५१ ॥
भाव कनकाचा परिएळी : जीव-रत्न- दीप उजळी मग आरती ओवाळी : श्रीसर्वेश्वराते : ॥ ५२ ॥ विकार कुरवंडी करुनि सांडावा :
अनुसरणाचा वीडा ओळगावा :
:
:
:
मग निर्वेद मंत्र म्हणावा : प्रतिदिनी ॥ ५३ ॥ आचार कनकांच्या परिएळी : स्मरणाचा ओगर ओगरी तुलेनि स्वीकरी सर्वेश्वरु : स्वामी माझा : ॥ ५४ ॥
::
1:0
थोडाचि निर्वेद म्हणितला तो श्रोता महानुभावी ऐकिला (अनुष्ठिला): तेणे संसार सांडिला : हरळाचिए परी ॥५५॥
ऐसा निर्वेद करीता : जीवासि होए चोखाळता :
प्रतिदिनी अनुष्ठिलीया होए योग्यता : वीतरागासि : ॥ ५६ ॥ महानुभावी निरुपिले : तेथचे कणुकणु काढिले :
मग नागार्जुनाचेया स्वामीते विनविले : पूजेलागी : ॥५७॥ महानुभावी निरुपिता : ऐसेचि आले माझेया चित्ता : निमित्तविधी होए योग्यता : आचरणेन ( आचार रक्षण): ॥५८॥ परी हे देह माझे न करीचि म्हणितले :
वरि अनधिकारे असे जिंतिले :
महानुभावाचिए भेटी नावेक सत्व उपनले
तयाचा जिव्हाळा मज : ॥ ५९ ॥
:
दिवस जातसे रजे राभस्ये वेगी : रात्र जातसे निद्रा प्रसंगी :
गुरुकुळाची सेवा न घडेचि सत्संगी : आता योग्यता ते कैची : ॥ ६० ॥जरि स्तुति करू म्हणे : तरि मागा महात्मे ( महानुभाव) पढिन्नले पुराणे : तेथ माझे शोच्याचे विनवणे (वर्णन) : काइसे तुजपुढे : ॥ ६१ ॥
जी मी असन्निधानी जन्मला :
तुज मायबापेविण निढाळ ठेला :
वरि सांडुनि दिला : निराधार देवा : ॥६२॥
जी मी तुझेया आचाराची नेणेचि निगुती : आता जीउनि अनिष्ट जोडू किती :
तुझेया भक्ता उपजली खंती : तेणे तू उदास मजसि : ॥६३॥ जळो जळो हे जियाले : तुज ईश्वरेविण हे देह उरले : मिया नाही मोकलिले : तयाचे कार्य हे : ॥ ६४ ॥
म्हणौनि आपुला निर्वेद करीन
:
तुझे श्रीचरण हृदयी दृढ धरीन :
नावेक परते ठेवीन : मनोधर्म हे : ॥ ६५ ॥
:
तुज अनुसरले : ते काइ जीवधर्म भोगावया उरले तेही मेलेयाचे अंगिकरले : तेथ कखावो कैचा पै : ॥ ६६ ॥ जी हे वरवडे तुज दिधले : अन्तर मागा ठेविले : म्हणौनि हे देह उरले : अनिष्टालागी : ॥ ६७॥ जरी वेच असता तुझा ठाइ : तरी मनोधर्माची नुरती राई : जळता दिसती खाई : या इंद्रियांची : ॥ ६८ ॥ रजातमाचा होत असे वळसा :
( मनोधर्म तमाचा भवतसे वळसा :) तेथ तू हृदयी येशील कैसा
:
म्हणौनि तो काळ लेखी लागेल ऐसा भरवसा करू न ये: ॥६९॥
:म्हणौनि विषयाचा विटाळु लागू नेदावा :
हा मनवा कवणीकडे जाऊ नेदावा :
बहूत
वेच तुझे ठाई होआवा : तै तू हृदया येसी ॥७०॥
:
जी तू अगाधाचा अगाधु : तुझा सनकादिका लागला वेधु : गोपी भक्ता तुझा छंदु (दीधला संबंधु) : तैसा देयावा मज: ॥७१॥ जी नेणे तुझे चरित्र कैसे : तुवा जळचरे वेधिली परेशें तैसे तुझे लागो का पीसे : रात्रंदिवस : ॥७२॥
:
ते गौरवर्ण श्रीमूर्ती जरी देखता : तरी हा आत्मा भेटीसी करीता : त्रिविधा तापापासौनि सुखिया होता : तुझा श्रीचरणी : ॥ ७३ ॥ जी तू माझी माउली विसावा : आणि सकळाही जीवा : घरोघरी करी धावा : भक्तालागी : ॥ ७४॥
काय वाणू ते उत्तर दिशा : तेथ निफज झाला वस्तुचा कैसा : म्हणौनि सिधे सांडूनि धाविन्नला कैसा : आर्तालागी : ॥ ७५ ॥ सदैव ते उत्तर दिशा : कवण वोवसली वोवसा : तेथे वरिसावो जाला कैसा : प्रेमाचा : ॥ ७६ ॥ ना ते उत्तर दिशा सासिन्नली : सुवर्णफुले फुलली : म्हणौनि आदिनाथे अंगिकारली : भाग्यवंत : ॥७७॥ की रत्ने माणिके मोतिए निफन्नली :
प्राकृता ग्राहिका न घेववली :
मग जाणतेन राये घेतली : उदारपणे ॥७८॥
ना ते उत्तर दिशा सौभाग्यवंत :
म्हणौनि आवडी असे तया देशांत
:
00
तेथचे असति आर्तवंत : म्हणौनि येणे नाही : ॥ ७९ ॥ ऐसा मी अजुनि जिते : कवणी सृष्टी जीवे न धरीचि तुते : म्हणौनि निर्जनी सांडिले माते : अमंगळ म्हणौनि : ॥ ८० ॥
:चरणावरी माथा ठेउनि : विनवित असे : ॥ ४१ ॥ जी औदार्य असे तुमते
:
तरि क्षणैक पाहावे माझिए आर्तिते :
आणिक काइ असे जीवाते : ते गोसावी जाणति : ॥४२॥
जी तू औदार्याचा रावो :
माझिए जीवीचा जाणसि भावो :
आपुलिया श्रीचरणी ठावो : द्यावा मज : || ४३ ॥
जी तुझेनि सन्निधानेविण : जिणेया परते निके मरण : तुझे न देखे श्रीचरण : म्हणौनिया : ॥ ४४ ॥ जी तू कुवासा ज्ञानियांचा : सारथी अनुसरलेयांचा बाप भक्तांचा : देवा तूचि पै : ॥ ४५ ॥
तुझा कृपा कटाक्ष भाव झळकता : तरी प्रेमाचा मोहर लागता :
:
तिही ठायाचा उच्छेद होता एराची चिंता तुजचि की : ॥४६॥ काइ मी मशक विनवीन :
कवणे परी ईश्वराते तोषवीन
:
काइसेन पूजा करीन : माते काहीच नाही : ॥ ४७॥ आता अनुतापाचे आसन रचावे :
अश्रुपाती चरण क्षाळण करावे :
मग स्वामीते विनवावे : पूजेलागी : ॥ ४८ ॥ कर्मत्यागे झाडावे : विकल्पे सारवावे :
काम क्रोधाचे चूर्ण करावे :
मग भराविया रंगमाळिका : ॥ ४९ ॥ :
तप चंदनाचा रेखुनि टीळा : मन-मोगरीया परिमळा आवडीचिया कंठीमाळा : ओळगवाविया ॥५०॥ धुपटना देहाचा : अंगारा विरहाग्नीचा : धूप ज्ञानेंद्रियांचा : उधळावा : ॥ ५१ ॥
भाव कनकाचा परिएळी : जीव-रत्न- दीप उजळी मग आरती ओवाळी : श्रीसर्वेश्वराते : ॥ ५२ ॥ विकार कुरवंडी करुनि सांडावा :
अनुसरणाचा वीडा ओळगावा :
:
:
:
मग निर्वेद मंत्र म्हणावा : प्रतिदिनी ॥ ५३ ॥ आचार कनकांच्या परिएळी : स्मरणाचा ओगर ओगरी तुलेनि स्वीकरी सर्वेश्वरु : स्वामी माझा : ॥ ५४ ॥
::
1:0
थोडाचि निर्वेद म्हणितला तो श्रोता महानुभावी ऐकिला (अनुष्ठिला): तेणे संसार सांडिला : हरळाचिए परी ॥५५॥
ऐसा निर्वेद करीता : जीवासि होए चोखाळता :
प्रतिदिनी अनुष्ठिलीया होए योग्यता : वीतरागासि : ॥ ५६ ॥ महानुभावी निरुपिले : तेथचे कणुकणु काढिले :
मग नागार्जुनाचेया स्वामीते विनविले : पूजेलागी : ॥५७॥ महानुभावी निरुपिता : ऐसेचि आले माझेया चित्ता : निमित्तविधी होए योग्यता : आचरणेन ( आचार रक्षण): ॥५८॥ परी हे देह माझे न करीचि म्हणितले :
वरि अनधिकारे असे जिंतिले :
महानुभावाचिए भेटी नावेक सत्व उपनले
तयाचा जिव्हाळा मज : ॥ ५९ ॥
:
दिवस जातसे रजे राभस्ये वेगी : रात्र जातसे निद्रा प्रसंगी :
गुरुकुळाची सेवा न घडेचि सत्संगी : आता योग्यता ते कैची : ॥ ६० ॥जरि स्तुति करू म्हणे : तरि मागा महात्मे ( महानुभाव) पढिन्नले पुराणे : तेथ माझे शोच्याचे विनवणे (वर्णन) : काइसे तुजपुढे : ॥ ६१ ॥
जी मी असन्निधानी जन्मला :
तुज मायबापेविण निढाळ ठेला :
वरि सांडुनि दिला : निराधार देवा : ॥६२॥
जी मी तुझेया आचाराची नेणेचि निगुती : आता जीउनि अनिष्ट जोडू किती :
तुझेया भक्ता उपजली खंती : तेणे तू उदास मजसि : ॥६३॥ जळो जळो हे जियाले : तुज ईश्वरेविण हे देह उरले : मिया नाही मोकलिले : तयाचे कार्य हे : ॥ ६४ ॥
म्हणौनि आपुला निर्वेद करीन
:
तुझे श्रीचरण हृदयी दृढ धरीन :
नावेक परते ठेवीन : मनोधर्म हे : ॥ ६५ ॥
:
तुज अनुसरले : ते काइ जीवधर्म भोगावया उरले तेही मेलेयाचे अंगिकरले : तेथ कखावो कैचा पै : ॥ ६६ ॥ जी हे वरवडे तुज दिधले : अन्तर मागा ठेविले : म्हणौनि हे देह उरले : अनिष्टालागी : ॥ ६७॥ जरी वेच असता तुझा ठाइ : तरी मनोधर्माची नुरती राई : जळता दिसती खाई : या इंद्रियांची : ॥ ६८ ॥ रजातमाचा होत असे वळसा :
( मनोधर्म तमाचा भवतसे वळसा :) तेथ तू हृदयी येशील कैसा
:
म्हणौनि तो काळ लेखी लागेल ऐसा भरवसा करू न ये: ॥६९॥
:म्हणौनि विषयाचा विटाळु लागू नेदावा :
हा मनवा कवणीकडे जाऊ नेदावा :
बहूत
वेच तुझे ठाई होआवा : तै तू हृदया येसी ॥७०॥
:
जी तू अगाधाचा अगाधु : तुझा सनकादिका लागला वेधु : गोपी भक्ता तुझा छंदु (दीधला संबंधु) : तैसा देयावा मज: ॥७१॥ जी नेणे तुझे चरित्र कैसे : तुवा जळचरे वेधिली परेशें तैसे तुझे लागो का पीसे : रात्रंदिवस : ॥७२॥
:
ते गौरवर्ण श्रीमूर्ती जरी देखता : तरी हा आत्मा भेटीसी करीता : त्रिविधा तापापासौनि सुखिया होता : तुझा श्रीचरणी : ॥ ७३ ॥ जी तू माझी माउली विसावा : आणि सकळाही जीवा : घरोघरी करी धावा : भक्तालागी : ॥ ७४॥
काय वाणू ते उत्तर दिशा : तेथ निफज झाला वस्तुचा कैसा : म्हणौनि सिधे सांडूनि धाविन्नला कैसा : आर्तालागी : ॥ ७५ ॥ सदैव ते उत्तर दिशा : कवण वोवसली वोवसा : तेथे वरिसावो जाला कैसा : प्रेमाचा : ॥ ७६ ॥ ना ते उत्तर दिशा सासिन्नली : सुवर्णफुले फुलली : म्हणौनि आदिनाथे अंगिकारली : भाग्यवंत : ॥७७॥ की रत्ने माणिके मोतिए निफन्नली :
प्राकृता ग्राहिका न घेववली :
मग जाणतेन राये घेतली : उदारपणे ॥७८॥
ना ते उत्तर दिशा सौभाग्यवंत :
म्हणौनि आवडी असे तया देशांत
:
00
तेथचे असति आर्तवंत : म्हणौनि येणे नाही : ॥ ७९ ॥ ऐसा मी अजुनि जिते : कवणी सृष्टी जीवे न धरीचि तुते : म्हणौनि निर्जनी सांडिले माते : अमंगळ म्हणौनि : ॥ ८० ॥
:आवो उत्तर दिशे बाइको : तेथ माझी माउली आली असे पाइको : ते कवणे परि डोळा देखो : ऐसा रात्रंदिस सोचित असे : ॥ ८१ ॥ ( आवो उत्तर दिशे बाइको : तेथ असे माझिये माउलीचा हेको ते कव्हणेपरी डोळा देखो : ऐसी चिंता वर्ततसे : 1 )
:
तिए उत्तर दिशेचा मार्ग लागे : तरि ऐसे दैव जोडिले नाही मागे : ऐसाही जावो म्हणे वेगे : तरी आज्ञा नाही : ॥८२॥
जी मी ज्ञानाचा दुष्काळी जन्मला :
तुज मायबापेविण निढाळ ठेला :
वरी अविद्येचा सुना ओढिला : चहुकडे : ॥ ८३ ॥ ऐसा मी टुकटुकीत असे : आता कवणीपरी जिणे कैसे : हे तुवा सांगावे परेशे : भलतेयापरी : ॥ ८४ ॥ आणिक एक विनवितो सायासी :
तुझेया भक्तावरी ओखटी बुद्धी मानसी
:
:
तेयाचेनि दुखविलेया तू दुखवसी : मग मी के रिगैन : ॥ ८५ ॥ जी तू पांडवांचा वेळाइतु दुर्वास भोजन मागो आला त्वरितु : तै द्रौपदीच्या धावण्या धावतु : बहुते वेगेसि: ॥ ८६ ॥ शिशुपाळ निंदा करीता : बहुत उपसाहिले गोपीनाथा : शें भरी सविया देता : शिरच्छेद केला पै : ॥८७॥ म्हणौनि संतांची निंदा करीता :
कव्हणी नाही झाला जाणता :
अठरा ब्रह्महत्या घडिलीया सांगता : जन्मेजयासि : ॥ ८८ ॥ म्हणौनि संतांची निंदा करीत :
तयाचिया कुळा क्षयो होय त्वरित :
पाठी काय करीति यमदूत : ते जाणवेचि ना : ॥८९॥
चौऱ्यांशी नरक सांगितले : आणिक बहुत
असति उरले :ते नाही विस्तारिले : जे कानी आइकवतीना: ॥ ९० ॥ खैरा इंगळावरी चालविता : थोर दुःख होए पाय जळता : जाचिता : : कव्हणी पुरे न म्हणे : ॥ ९१ ॥
ऐसे यमदूत
तापलेया तांब्रपत्रावरी चालविता : जीव न वचे देह जळता : तेणे दुःखे चडफडिता : परि यमदूत कठीण ते ॥ ९२ ॥
::
:
मग नेति असिपत्राचिए वाटे : तयाची पत्रे खांडेयापसि तिखटे तयावरी घालिता देह तुटे : ते दुःख काय सांगो : ॥९३॥ मग नेउनि कुंभिपाकी घालीति : वरी चांग झाकण ठेवीति भितरी खतपता कढति : त्या दुःखा अंतु नाही : ॥ ९४ ॥ हे देशवळ नरक जाणावे : ययाहूनि नित्य थोर परिसावे : म्हणौनि बरवेया परी संत अर्जावे : भलतेनि: ।। ९५ ।। हे नरक मिया आइकिले : तव पोटी पाय रिगाले :
:
ऐसे बहुत असति अर्जिले : आता निस्तरैन कव्हणी परी: ॥ ९६ ॥ जे रक्ष रक्ष माते : थोरे काकुलती विनवितो तूते :
पाहो नको माझेया अपकाराते : तू माउली माझी : ॥ ९७ ॥ जी तू कृपेचा सागरु : आर्ताचा उदारु :
जीवासि तारिता भवसागरु : हे सहज गुण तुझे : ॥ ९८ ॥ जी तुज अखंड जिवाची चिंता : हे वचन आइकिले ताता : तरी माते वेगळे न करावे कृपावंता : देवदेवा : ।। ९९॥ जी अखंड तुमते आशंसिता : तुम्ही न कराल माझी चिंता : तरी प्रेमासि पात्र नव्हता : तूचि करुनि दावसी की : ॥ १०० ॥ जी तुमते उद्धरावयाचे व्यसन असे
तरी माते लावावे भक्तीचिए कासे :
:
आपुले प्रेम देउनि विश्वासे : ब्रिदे साच करावी : ॥ १०१ ॥ जी असन्निधान दुरौनि दिधले :म्हणौनि स्वीकरिसी ना माझे विनविले :
कव्हणी सृष्टी नाही जोडिले : तेणे तू उदास मजसि : ॥ १०२ ॥ जी परिसाना माझी विनंती :
वास न पहाल माझिये येउति
:
तरी कैवल्यदानी ऐसी ब्रिदे म्हणौनि जाल केउति : मिया जीवेसि धरिले असे : ॥ १०३ ॥
संसार सोडविता ऐसी आइकिली कीर्ति :
तुम्हा शरण आलो मी निश्चिती :
तरी माझे सत्व पहाल किती : शोच्या जीवाचे : ॥ १०४ ॥ महानुभावांचा आचार कानी आइकिला :
एकाचा प्रत्यक्ष डोळा देखिला :
म्हणौनि तया सोइ लागला : अनुष्ठावया ॥ १०५ ॥ गरुडा तिही लोकी गमन : एरी पक्षी काइ न करावे उत्पवन : तैसे आचाराचे अनुसंधान : न सांडावे तापसी : ॥ १०६ ॥ जय जय अच्युता अव्यक्ता : जय जय निर्गुणा गुणवंता जय जय बोधदायका व्यक्तमंता : तुज नमन असो : ॥ १०७॥ नमन तुझेया ज्ञानिया भक्ता : त्यागिया शरणांगता :
तापसा विरक्ता : मुख्य करुनिया : ।। १०८ ।।
जयासि विषयाचा विटाळु न लगे :
अभिलाष जयाचिए सेजे नरि
:
जेही काम क्रोध वाटुनि घातले गंगे तया तापसा नमन माझे : ॥ १०९ ॥ जेही सर्वस्व सांडिले : आपले जन्म ईश्वरा दिधले : जयाचा हृदयी अवस्थान केले :
:
::
तया बोधवंता नमन माझे ॥ ११० ॥ तो बोधवंत कैसेनि ओळखिजे : अन्यथाज्ञान न ये जयाचिए वाचे : तो वा काले स्मरणाचे : आणिक काइसेया नातळे : ॥ १११ ॥
तो सकळापासौनि निवर्तला : आन काइसेया नाही उरला : तो ईश्वरी असे वेचला : रात्रंदिवसु : ।।११२॥ शास्त्र श्रुति स्मृति : गुरुकुळेसि असे प्रिती : तयासि देवाची आर्ती : अखंडित पै ॥ ११३॥ जेणे अभिलाष जिंतिला : राग द्वेषाते पहुड घातला : कामक्रोध पाटा वाटला : ज्ञानाचेनि बळे : ॥ ११४ ॥
::
संसार ठोकरी हाणितला : तव काळे हात झाडिला : देवे श्रीकरी घेतला : शरणांगत म्हणौनिया : ।।११५।। तो संसारासि रुसला :
म्हणौनि सकळाही वंद्य जाहला : अपरोक्षज्ञानिये माथा तुकिला
:
तयाचा आचार देखोनिया : ।। ११६ ॥ तेयासि इंद्रादिक आपुले परावे जाले ब्रह्मादिक दांत चाउनि राहिले :
:
माया आपुलेपणे खेळविले : विशेषवेही : ।। ११७॥
तयासि ईश्वरसन्निधानाची घरटी : ब्रह्मादिक धावति पाठोपाठी : चारी दाने देउनि सेवटी : ईश्वरस्वरूपी मेळवीति : ॥ ११८ ॥ तया ज्ञानियाचेनि दर्शने : पापा होति पुरश्चरणे
00
तयाचा अव्हेर न करावा कव्हणे : भलतेनि वंदावे : ।। ११९ ॥ जी मज नाही कव्हणाचावरि काळ जात असे दुर्धरु : रात्रंदिवस लोटावया काय करू : तू अखंड आठवीसि ना : ॥१२०॥ म्हणौनि ऐसेया परी आपुला काळ क्रमी : दिवस जावो नेदी मनोधर्मी :
ऐसे विचारावे तुम्ही : या दो माजी कव्हण चांग : ॥ १२१ ॥ नागार्जुनाचा स्वामी स्मरता : जीवाची बंधने तुटली आचरता : योग्य जालेया होए सायुज्यता : परब्रह्मेसि : ।। १२२॥ लटिके तमणे : अपयश करणे
:
अभिलाषा येउते मने: योगीया जावो नेदी : ॥ १२३ ॥ अचळ मुरारी अनुष्ठिता : अविधि रिगावा नाही पाहाता : आचारी होए दक्षता : निरुपम : ॥ १२४ ॥
दामुनि निर्वेद म्हणितला : तो महात्मजनी आइकिला :
जैसे मायबाप तोखति बाळकाचिया बोला : धाकुटे म्हणौनिया : ।।१२५।। इति निर्वेद स्तोत्र संपूर्ण ||