श्रीकृष्ण नाम महिमा स्तोत्र
श्रीकृष्ण नाम महिमा स्तोत्र
कृष्ण नाम हे आठवी जीवा ।चुकती तुझ्या संसृती भवा ॥
कृष्ण नाम हे तारकू जना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥१॥
रागद्वेष हे सांडूनी त्वरी ॥लोभ मत्सरा टाकूनी दूरी ॥
काम क्रोध पै नाशी दुर्जना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥२॥
द्रौपदी सभे तूज चिंतिले ।धावणे तुझे शीघ्र पावले ॥
शिख लाविली कौरवा जना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥ ३
धावता ऋषि भोजनां वनां । सत्व ढाळण्या पंडुनंदना ॥
त्याशी दंडिले रुंझुनी मना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥४॥
जैद्रथे वनीं हरीलि द्रौपदी । नाम आठवी तैं तुझे ब्रिदी ॥
शीघ्र धाऊनी सोडवी वनां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥ ५॥
लाखा जोहरी पंडुनंदना | रक्षिले तुवा मार्गदर्शना ||
क्षत भाषणे धाडिशी वनां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ||६||
नावी मिन्नल्या गोपिकांजनी | नीर दर्शता त्या नितंबिनी ॥
भ्यालिया मनी नामकीर्तनां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥७॥
भीमनंदिनी नाम रुक्मिणी । शिशुपाळ पै नावडे मनीं ॥
नाम कीर्तिता पावशी रणां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥८॥
स्वात्मप्रौढिये बंदी भूपति । घातले जरासंध कुमति ॥
पावलाशी तू बंधछेदना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ।।९।।
त्वत्पदांबुजा प्राप्ती कारणी। ध्यानि बैसली सूर्यनंदिनी ॥
पावलाशी तूं सत्वरे वनां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥१०॥
संकटी उत्तरा नाम ध्याइले ।सुदर्शन त्वां आड घातले ॥
रक्षिले अभिमन्युनंदनां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥११॥
दक्षिणे गुरो सुत याचिले । यमलोकीचे शीघ्र शोधिले ॥
आणुनी दिली पुत्रदक्षणा । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥१२॥
नाम चिंतने सार्थकू जीवा । पावसी तया सर्व वैभवा ॥
नाम जाये ते विघ्न येईना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥१३॥
नाम चिंतनी राही तत्परा । नाम आठवी अष्ट प्रहरां ॥
नाम हेचि पैं जीव तारणा । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥१४॥
नामेविण जो श्वास लंघिना | त्यावरी नभारिष्ट येईना |
नाम वेधकु बोधकु जनां ।हे दयाळुवा श्रीकृपाघना ।। १५ ।।
दाही कारणे नामची करी ।चारी कारणे स्वरुपांतरी ॥
नाम तोडी पै सर्व बंधनां ।हे दयाळुवा श्रीकृपाघना ।। १६ ।।
चारी त धरी पावशी तरी । तूचारी नाही ते राहिले दूरी ॥
चारी आठवी शुद्ध भावना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ।।१७।।
अष्ट राणिवें नित्य वेष्टिला ।। पूर्ण न्रीक तो त्याशी बाणला ॥
द्वादशा उणा कोठे दिसेना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ।। १८ ।।
त्रीकु सोडूनी त्रीकुतें धरी ।त्रीकु दुसरा सांडी तू दूरी ॥
शीघ्र पै करा चौक साधनां । हे दयाळुवा श्रीकृपाघना ।। १९।।
रागषट्क है शत्र भूतळी । शत्रु पंकजे जननी तळी ॥
अष्ट शत्रुच्या आठवी खुणा । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥२०॥
नाम सांडूनी अन्य चिंतीती। जीव देवता व्यर्थ बाहाती ॥
क्षुद्र देवता ध्यानी साधना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥२१॥
जीव देव हे दोन्ही वेगळे | एक मानितीं जन्मआंधळे ।
देव तो कहीं जीव होयना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥२२॥
देव नाम हे तारकु जीवा ।जीव नामें पै भोगितो भवा ॥
देव तोडितो बंध यातना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥ २३ ॥
सुकीना भला ग्रामु पै जया । तेथिचा मुनि दत्त योगिया ।
शिष्य गोविंदां रक्षी सज्जना । हे दयाळुवा श्रीकृपाघना ॥ २४ ॥
इति श्रीकृष्णार्पणमस्तु