श्रीप्रभु स्तोत्र
श्रीप्रभु स्तोत्र
अनुचित कलहाचा संग फेडि मनाचा ।
करपद मम देई श्रीप्रभु दिव्य वाचा ।
श्रवण नयन भावी दक्षता सत्यवाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्यवाचा ॥१॥
सकळ गुणी जनाचा भार फेडी तमाचा ।
कपटपट मनाचा दोषी पै मार्गिकाचा ।
जयपद मम देई सत्य सिद्धांत वाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥२॥
अति रूचिरविकासी मार्गीका हेतुराशी ।
परतर कुळ देशी देवता देव केशी ॥
अति गहणतराचा भाव भावी मुनीचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्यवाचा ॥३॥
तव नगर पतस्था वेच देई शुभस्था ।
मम धन रहितस्था श्रीप्रभु भक्ती संस्था ॥
गहन मुनीवराचा दानी तू सज्जनाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥४॥
तव हन हीन निंदा दूर घाली प्रमादा ।
जडमति हत मोदा स्थापिता मार्ग सादा ॥
सकळ जनमनाचा कर्षिता दुर्जनाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥५॥
तव पुर गमनार्था मार्ग देई समर्था ।
गति सकळ भयार्थी रिक्त चोरी कदार्था ॥
मम शरणगताचा तारिता तुचि साचा ।।
परम गुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥६॥
परतर गत सुत्रे कार्य माझे चरित्रे |
अकळित करी मंत्रे गूढ जो लोक तंत्रे ॥
अति कुटील मनाचा हारीता तूचि साचा ।
परम गुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥७॥
भज भज परमेशा गुंडमाख्यादि तू श्री ।
भज भज सकळेशा श्रीनिवासा महाश्री ॥
कृमि विधिपदरोचा भाव भावी मुळाचा ।
परम गुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ||८||
बहुचय बहुरुपा देवतानंदरुपा ।
प्रतिगृही बहुरुपा खेळता स्वस्वरुपा ।
विगळीत सुखाचा दानी जो मंगळाचा ।
परम गुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ||९||
प्रभू मम जय दे दे वादिया भंग दे दे ।
निजपद मम दे दे विज्ञता ज्ञानी दे दे ||
शरणगत कृताचा बोध दाता सदाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥१०॥
जय जय भगवंता श्रीप्रभु दीव्यवंता ।
सुरनिकर शिवंता सर्वदा साक्षिभूता ॥
गळित परसुखाचा बोधशीळा सदाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥ ११ ॥
प्रभू पर शिव घे घे वादिया दर्प घे घे ।
खळतर जय घे घे दुर्जना मानु घे घे ॥
बहु कृत विनतीचा आग्रह भीष्मवाचा ।
परमगुरु हरिचा तू प्रभू दीव्य वाचा ॥ १२ ॥
॥ इति श्रीगोविंदप्रभु अर्पणमस्तु ॥