साधनामृत स्तोत्र मालिनी
साधनामृत स्तोत्र मालिनी
परतर गहनत्व ऊमटे साधनाचे ।
अवर पर पदार्थी ज्ञान होए चहुचे । मनन मथन योगे शास्त्र जे सुंदराचे । श्रुत गुरुवचनीचे राखिजे नित्य साचे ॥१॥ शिवकर गहनासि ऐसेया साधनासी । परसुख गुणराशी तो निरुपी जनासी ।
अनुसृत पुरुषांसी जे करी योग्यतेसी । सतत हृदय देशी चिंतिजे नित्य वासी ॥२॥
इंद्रवज्रा
ऐसे परानंदकर प्रभुचे । अनंत भेदी परमत्व भावे । जाणौनि हे साधन आत्महिता । अनुष्ठिजे साधक योगीराजे ॥३॥ याचा अव्हेरु न घडे जयासी । भेटे तयासि परचक्रपाणि । करौनि चिद्वर्य परे तयाते । कैवल्यनाथे निजसौख्य दीजे ||४|| याचा अव्हेरू करीता विशेषे । तेणे परेशे धरीजे उदासे । उदास जाला सुरराज पाही । कोठे तयासी मग ठाव नाही ॥५॥ ऐसा अव्हेरु मज दैन्यरूपा । घडे विशेषे बहु पाप दीपा । शास्त्र प्रसादावरी लक्ष नाही । कृतघ्न पाही मजविण कैचा ||६|| निरुपिता देव वरात्मविद्या | मनी कुविद्या मज संचरे पै । न ये प्रभुचे मज नाम वाचे । कामादिकाचे गृह मीचि एक ॥७॥
शालिनी
माझी माता सुंदरु चक्रपाणि । भेटे जेणे कार्य ते भार मानी ।चक्रेशाची नाठवी गुणकार्ये । नाना युक्ती विषयो चिंतिताए ||८|| सांडी देवा जीवजातासि आप्त । मानी तेणे होई पै दुःख प्राप्त । ज्याची जैसी स्वार्थता जेणे पुरे । ते ते मासी वर्तती नित्य वैरे ॥९॥ रागी द्वेषी मत्सरी क्रोध कामी । वर्मस्पर्शी सर्वदा आथिलो मी । जे जे देवे वारिले नित्य साचे । ते ते माझे वर्तन दोषजाचे ॥ १० ॥ माझे जीणे सर्वदा कीर्ति मेळी । मिथ्या बोले जाणता सर्व काळी । माझे लक्ष द्रव्य यंत्री सदासे । अन्यश्रीचा ताप भोगी विशेषे ॥ ११ ॥ कोण्ही बोले गोष्टी आश्चर्य शब्दी | वाये तेथे डांकुली चित्रभेदी । नेणे लीळा प्रकर्णे वाक्य जाती । साधी अर्था शब्द मोडुनि स्वोक्ती ॥१२॥
इंद्रवज्रा -
ज्ञाता विरक्तु मजविण कैचा । बोलोनि दावी अतिदीर्घ वाचा । सांडुनि सर्वे गुण आणिकाचे । जे क्षुद्र दोषा गिवसी तयाचे ॥१३॥ गर्वाभिमाने अध मी न बैसे । आचारवंतु म्हणवी विशेषे । देखोनि माना पुढिलासि आधी | जळौनि उठे अतिदुष्ट बुद्धी || १४ || ज्ञातार देखोनि जळे परश्री । संताप दोषे अतिसे स्वगोत्री । उपाधी ऐश्वर्य बळे सतेजे । दंडोनि धाडी प्रसवाथिलेजे ॥ १५ ॥ सामान्य जे साधन थोर देखे । त्यालागी जाळी बहु भिक्षु रोखे । गोभक्षका द्रव्य समृद्धी वेची । हिरौनि आणि मग थोर मीचि ।। १६ ।।
वसंततिलका
जाणौनिया सकळही ढ ओखटे जे ।
ते मी करी, अविधि जोडि परसाभिलाषे । संन्यासलक्षण सदा विहिले परेशे ।
ते अल्प वर्तन कदा न घडे स्वदोषे ॥ १७ ॥इंद्रवज्रा
ऐसे सदा दोषज जन्म माझे । नानापराधी सकळांतु साजे । देखौनि ऐसा अतिपापरूपु । उदास जाला प्रभु मायबापु || १८ || तन्मायबापे मज वारिले ते । करी सदा मी, विहिले न वर्ते । विण प्रमादे न वचेचि सृष्टी । पडे म्हणौनि भव दुःख कष्टी ॥१९॥ देखौनि माते भ्रमभूत ऐसा । उठी कृपा त्या प्रभु चिद्वरेषा ।
धावोनि ये तो मजलागी पाहे । पळौनि जाए निरयाकडे मी ॥२०॥ तो सौख्यकर्ता मज शत्रु वाटे । कुयोगीया होउनि मी अव्हाटे । घडे गुरुद्रोह सदा जयासी । त्या केवि जोडे विभु सौख्यराशी ॥२१॥ अधिकवृत्ती गुरुहनि वर्ते । भिक्षुसि बोले बहु ओखटे ते ।
चैतन्य जाळी अतिशब्द माझा । त्या केवि जोडे विभु सौख्यराजा ॥२२॥ कखाइ विकल्प विखो विकारी । कामादि दोषी भरलो अपारी । नाही क्रियेचा अनुताप तोही । कैचा तयासी परलाभ पाही ।।२३॥
मालिनी
छळन अविधि जोडी देवताते विरोधी । उपजवित सदा मी क्रोध पैसारबुद्धी ।
हननजनित मिथ्या हांसता शब्द बोले । विपरित कथनेसी जन्म ऐसेचि गेले ॥२४॥ त्यजुनि परमधर्मा सांडवी आणिकाचे । करुनि विषय दंभे पूरवी इंद्रियांचे । वसवित बहु ठाये छेदिले जे परेशे । वितथ विगत तेणे जन्म माझे सदोषे ॥ २५ ॥ शिवतर विधि पावे सांडुनि जाए ऐसा । प्रकटित जनशुद्धी आपुलिया रहस्या ।इति मम बहु दोषा नाठवी तो समस्ता । अवतरुनि कृपाळु होय पै ज्ञानदाता ॥ २६ ॥ कणव करुनि बोधी जाणवी मार्ग दोन्ही । मशिन न वटे ते पूर्व दोषादि चिन्ही । विभुवरि परतौनि मी करी विश्वघातु । कणव कणु नुरेचि कोपला तो अनंतु ||२७|| इति बहळ अयोग्ये मी सदा जाणुनीया । धरुनि परमखंती निष्ठुरु होउनीया । भव विपिन दुरंती तो मला सांडुनीया । सुरविभु दुर गेला सुंदरु कोपुनिया ॥ २८ ॥
इंद्रवज्रा
अव्हेरु केला मज भेटि नेदी । कोण्ही वदा का मजलागी शुद्धी । कोणासि पुसे कवणासि सांगे । कोणासि मागे परदैव माझे ॥ २९ ॥ आहा कटा दैवहता कपाळा । कैसा परेशे धरिला अबोला ।
जे जे दिशे घालुनि दृष्टी पाहे । ते दैवरायेविण वोस दिसे ॥३०॥ जळे धडाडा मन चित्त माझे । त्या देवराजे त्यजिले म्हणौनि । कोणासि माझे म्हणिजे विशेषे । अव्हेरु केला वरि चिद्वरेशे ॥३१॥ अहो करावी परमेश शुद्धी । ऐसी कदा मे नुपजेचि बुद्धी । कोण प्रसन्न करील प्रभुसी । सांगा सखे हो मज पापियासी ||३२|| आहो अखंड परसन्निधीसी । ते भक्त तुम्ही विनवा प्रभुसी । दये मये सुंदर कारुणे वो । करा प्रसन्न करुनी उपावो ॥३३॥ आवो कृपे मोहन साजनी वो । तो वश्य तुजला प्रभु देवरावो । कृतघ्न पापी मज दैन्यरूपा । लागी प्रकर्षे विनवी सुबापा ॥३४॥ प्रसन्नतेचि मज वृत्ति नाही । म्हणौनि पाही म्हणते तुम्हासी ।्यावा करुनि प्रभु वश्य तुम्ही । अनंत कर्मी बहू बद्ध झालो ॥३५॥
मालिनी
कवण मज निमित्ते राहुनी जी परेशा । करितिल मज लागी दास्य काही सुबापा ।
मज तरि मुख नाही वीनती
तूज 1 तुजविण परभावी तारिजे कोण दूजे ॥ ३६ ॥ मजवरि धरिसील सुंदरा जी उदास । तरि भवहरणाची पूरवी कोण आस धरिसील मम खंती सुंदरा जी अनंता । गुरुकुळ मजलागी ठावो नेदी अनाथा ||३७|| विविध परम दोषी जाणुनी साह्यरूपा । घडी घडी मजलागी पावसी विश्वबापा । अनुस्युत मजलागी संकटी सोडवीसी ।
तर विभु अजुनी का निष्ठुरु दिसतासी ||३८|| तव विमुखपणे मी जाईन नित्य
दुःखा
म्हणुनि केविलवाणा वीनवी तूज देखा । जननी भगिनी पिता बंधु तू आण नाही । धन कण गृह विद्या तू सखा सर्व पाही ||३९||
शार्दुलविक्रीडित
जैसी टोंगळ अर्भकासि जननी ते जाएना सांडुनी । तैसे वो करुणाकरे तू मजला त्येजू नको चाल्हनी । लीळादान निरार्जवी जनचया देऊनि नेसी पदा । ब्रह्मानंदन चिद्धने करि तथा नासुनी दोषापदा ॥४०॥इंद्रवज्रा
नाशीसि जेणे भवदोष मोसा । कैसाधिकारु मजलागी तैसा । म्या जोडि नाही कव्हणीचि केली ।
तुझेनि मार्गे न घडेचि चाली ॥४१॥
विसाक्षरी प्राप्ती चिदांग माळा । जोडेचि ना मी विषयी कृपाळा । सहस्र सोळादिक भेद जेथे । लाहेचिना मी गतकर्म पंथे ॥४२॥ शून्य द्विभेदी सदवाप्ति चित्रा | जोडेचि ना ते मजला अपात्रा । विशत्सुशास्त्री गुणधर्म माळा । सत्केवळादि प्रबळैक मेळा ॥४३॥ ते साधनी मी न रिगेचि पाही । ऐसा कुबुद्धी मजवीण नाही । रीगेचि ना शाश्वत तुल्य सेजे । मा सौख्य कैचे मजलागी तुझे ॥ ४४ ॥ तुझी कृपाळा करिता आस । नको धरु जी मजसी उदास । नित्यादि दुःखे बहुतैक पुढा । देखौनि वाटे मज पै धडाडा ।।४५।।
ते
दुःख भोगे मज जांच होती । ते शोचिताए बहु दिन राती ।
जाले जडत्व तव योग लाहे । ते जोडि कै ची मजलागी पाहे ॥ ४६ ॥ छिन्नस्थळी मुख्य खिळास्पदेते । त्या पुण्य पुर्वी नवलैक होते । अटैक भोगे जर रेणु कोडे । संबंध तुझा मज केवि जोडे ॥४७॥ अनेक हाती जरि जन्म पाही । त्वद्योग जोडे अधिकार नाही ।
ते
पुण्य कैचे रेणु होता । तू क्रीडसी जेथ विभु अनंता ॥ ४८ ॥ जे कृमी नेली प्रभु सत्पदासी । ते भाग्य कैचे मज पापियासि । त्वा वेधिली दर्दुर पक्षि जाती । लाहावया ते न घडेचि वृत्ती ॥४९॥ होउनी भोगी तव सन्निधानी । देहान्त पावे तरि दैव मानी । व्याघ्रार्भका स्पर्शन सुंदराचे । तैसे कृपाळा मजलागी कैचे ॥५०॥ तो पंचकौळी ग्रहराज कैसा । जो योग्य जाला तव भुक्तशेषा । ते पावता जी जरी देह पाही । तैसाधिकारु मजलागी नाही ॥५१॥व्याध प्रखेदाति भये पळाला । ससा परेशा तुजपासी आला । जानुतळी रक्षुनी मुक्त केला । ते जोड कैची मज पापियाला ॥५२॥ त्या तस्करा कृत्य निजांग संगी । त्वा मुक्त केला कृपयातिवेगी । तैसे परेशा भवदुःख भोगी । कै सोडवीसि मज सृष्टीरंगी ॥५३॥ पुण्य कैचे अश्वादि जन्मी । तो वासनायोग्य नव्हे कदा मी । ते पै क्रिया गोकुळ गोधनाची । तैसी कृपाळा मजलागी कैची ॥५४॥ भिल्ला गोंडा प्रभु योग तुझा । तैसा न देवा अधिकार माझा । मा गोकुळी ते जन सन्निधानी । ते जोडि कैची मज चक्रपाणि ॥५५॥ तो डांगुरा मंगळ देहीधारी । नुरेचि देवा तुमच्या वियोगी । ते देह पावे जरि पूर्व दोषे । तैसाधिकारु मजला न दिसे ॥५६॥ आलिंगनाव्हान कुमारिकेसी । प्रशंसिली जी निजभक्त जैसी । स्वश्रीकरे घालुनी खाद्य तोंडी । ते केवि जोडे मजलागी जोडी ॥५७॥ प्रात: प्रहारी सलिला प्रविष्टा । गंगोदके मच्चित येल्हनीष्टा । तुझेनि नामे तरली ती सुष्ठा । ते जाडि कैची मजला कनिष्ठा ॥५८॥ तो क्रूर बुद्धी द्विजराज आला । तुवा परेशा निजभक्त केला । तथा कृपाळा कृत तैल्यकारु । तैसा न जोडे मजलाधिकारु ॥५९॥ त्या पद्मनाभी कृत दुष्टबुद्धी । त्वा नाशिली वेधकरा कृ पाब्धी । त्वा नाशिले तस्कर दुर्मतीसि । नाशी परेशा मम वृत्ती तैसी ॥६०॥ तन्मंडळीके प्रभु आत्मरामा । समर्पिले जी तुज सप्तजन्मा । नागांबिका नागमुनींद्र जोडी । तैसी न दिसे गत जन्म कोडी ॥ ६१ ॥ कुयोगीया मी कुमतैक बुद्धी । गुंतोनि ठेला विषयादि बंधी । तुझी कृपाळा न करीचि शुद्धी । म्हणौनि ऐसा पडलो भवाब्धी ॥६२॥ निरार्जवी मी परि तू कृपाळु । आकर्णी ऐसा श्रवणी दयाळु । ते बोलती संत परेश तूते । म्हणौनि देवा तुज विनविते ॥ ६३ ॥ वैराग्यवेषे नटसि कृपाळा । भक्तासि देसी निजसौख्य मेळा ।अनंत दाने दिधली जनासी । विस्तारिली मंगळ कीर्ति कैसी ॥ ६४ ॥
मालिनी
झणि विषम धरीजे त्यांतु पै मी अनाथा ।
चित्पर परमेशा ब्रह्म कैवल्य नाथा ।
करुनि सुभग लीळा नाशिसी दोष माझे । तरि सकरुण साजे सुंदरा नाम तूझे ॥ ६५ ॥
शालिनी
काळस्फोटी व्याधिता दीन नारी । तारी देवा तारी का शीघ्र मारी । इत्यालापा क्रंदने पावलासी । तैसा पावे दुःखिता पापियासी ॥ ६६ ॥ जिव्हा रोगे कामिनी मृत्यु होता । साधे प्रार्थी जीववी दीननाथा । आस्योच्छिष्टे रक्षिले वीटपीके । माते संसारा मया तेवि राखे ॥ ६७॥
इंद्रवज्रा
माळेकरा प्राणगताही दृष्टा । त्वा जीवविले प्रभु चिद्वरिष्ठा । भवादि द्रंष्ट्रा मजलागी तैसा । तू पाव वेगी करुणाकरेशा ॥ ६८ ॥ रात्री तुवा चाचरमुद तीर्थी । जावोनी तेथे समवेत भक्ती । ते जीव नेले परसौख्य ठाया । तैसे करावे मज देवराया ॥ ६९ ॥ निष्ठुर तू देखुनी विश्वमुर्ती । अव्हेरिले जी मज साधुसंती ।
ते खंती माझी तुज पै न यावी । विज्ञाप्ती ऐसी प्रभु आइकावी ॥ ७० ॥
शार्दूलविक्रीडित
कामाख्या हटयोगिनी हट करू आली तया ईश्वरा ।तीचा पै हट देखुनी हटवरे सांडौनि देहान्तरा । ते स्वीकरले हटे निजकळा सर्वालये शाश्वते । तीचे साधन जी झणे मज घडो ऐसे तुते प्रार्थितो ॥ ७१ ॥
शालिनी
घोडाचुडी शिष्य सांडौनि जाशी ।
तैसे स्वामी मे नको किंकरासी ।
जैसा आंबा विंझदेवाधिकारी ।
त्याचा जन्मी घालिता जी निवारी ॥ ७२ ॥
भूगावीचा कंटकु जी कृपाळा । तैसा ठाई हो झणी जन्म मेळा । भक्ताचिए वीनती मानसी ना । नेदी माते ठाय ते रंक दीना ॥७३॥ एकांबेची जेवि पै खंती तूते । आली जेणे ते नको चाली माते । राया येता दर्शना चुकविले । तैसे ना जी आइकै विनवले ॥७४॥ आहो देवा ब्रह्मसानादि संगी | मायादेवी घालिता वार वेगी । आहो स्वामी पैठणी मीनले जे । तैसे ना हो अंतरी भाव माझे ॥ ७५ ॥
इंद्रवज्रा
ज्या पै विरक्ता प्रति छेद केले । जो बोलविता तुजसी न बोले । तांबुळ दाने तुज नोळखेचि । तैसे न व्हावे मजला प्रभुजी ॥ ७६ ॥ ग्रहत्व पावे मज लक्षुमीया । नको करू जी प्रभु देवराया ।
१७३
जे जे अयोग्य तव दानकाळा । त्यामाजी माते न घली कृपाळा ॥७७॥ असत्य विप्रे वदता अनंता । प्राणान्तु झाला तुझीया सुभक्ता । इत्यादि दोषान्वित लोक जे जे । त्यामाजी हो जी झणी जन्म माझे ॥७८॥
शार्दुलविक्रीडित
वृद्धासंगमी यातुनी खिळपरा जेथे प्रभु नांदता ।जे हंतकु चालिले तुजवरी त्यामाजि घालू नको माडी द्विजसन्निधी बहुजना त्यामाजि मेळा नको रुद्रा जी करुणाकरा मज किरु हे वीनवीतो तुला । (ऐसी दोष विचित्र दृष्ट बहुधा नासौनिया सुंदरा । लावी जी निजसाधनी मज सदा हे वीनवीतो तुला ।। ७९ ।।
वसंततिलका
प्रेमे प्रसाधन परा मजलागी तुझे । तैसे करी निजकृपा करुनी प्रवेधे । ते चूकवी निरयराशी विचित्र माझी । देऊनि सन्निधी परा परमेश तूझी ॥८०॥
इंद्रवज्रा
चैतन्यमुख्यादि फळे विचित्रे । त्या जी नको गौणवरे पवित्रे । धर्मादिके आणिक सत्पवित्रे । आशंसिनाष्टांग कुळैक गोत्रे ॥ ८१ ॥ पंचांग देई निज सन्निधानी । हे मागता तुज चक्रपाणि ।
मे जीविचे तू खलु जाणतासी । मी जाए ना जी शरणाणिकासी ॥८२॥ आलिंबने मी गुंतुनी आहे । तही मनी जी तुजलाचि वाहे ।
जाणौनि ऐसे भवपाश तोडी । लीळे करौनी खिलकर्म कोडी ॥८३॥ नेऊनि घाली निजभक्त मेळी । जया तुझी सन्निधी सर्व काळी । विज्ञप्ती ऐसी प्रभु नित्य माझी । ते साच मानी करुणाकरा जी ॥ ८४ ॥
मालिनी
जय जय बहुवेधा मोहनीस्था प्रसिद्धा । जय जय परबोधा जीव दैन्यावशुद्धा । जय जय खिळ पारा नाम सिद्धान्तसारा । जय जय चिद्वर्या भक्त साध्या प्रबोध्या ।। ८५ ॥इति कृत कवि डिंभे मच्छ देशोपसंज्ञे । स्तवन विरम शब्दी कृष्णदासे अजाणे । शशि गुरु वर दाने स्तोत्र हे सुंदराचे ।
पठति मुनि सदा जे दोष जाति तयाचे ॥ ८६ ॥
स्रग्धरा
हे श्रीचक्रेश्वराचे स्तवन कृत मिया आत्माध्यानार्थ कार्या । मयावे लागेल तेणे विमळ मतिवरे सांडुनि साभिमाना । जेथे जो शब्द वाटे अघटित हृदयी नेणता अर्थ त्याचा तेथे स्वोक्ती न कीजे जरि मन विकरे ना असे तेचि निके ॥ ८७ ॥ इति श्रीमन्महोपामयाय - दीक्षित विराटदेशोपनामालंकृत मयंकराजसुत कृष्णमुनि - विरचित श्रीसाधनामृत स्तोत्र संपूर्ण