पंगतीचे श्लोक
पंगतीचे श्लोक शार्दुलविक्रिडीत
वंदू श्रीचक्रधरा कृपागुणवरा सर्वेश्वरा चित्परा । कारुण्या नट नागरा द्वयकरा विघ्नादि दोषा हरा । संबंधे जड जीव तारुन वरा पूता कृता ही धरा । दातारा करुणा करा वरमती द्यावी विभोगुर्जरा ॥१॥ जीवा जीवन जे परामृतकरा कैवल्य संजिवनी । पापे ताप विनाशिती गुणवरा कारुण्य कादंबिनी । दोषा छेदक भेदका त्रयमती ज्ञाने त्रिके लोचनी । साध्या प्रापक साधनी शिवकरा ते मूर्ती माझ्या मनी ॥२॥
यन्मूर्तिस्मरणावलोकनमनानन्दाप्तिविद्यावशा- श्चैतन्याद्यनुषङ्गसिद्धिसुभगां जग्मुः सुसिद्धिं नराः । संसारप्रचुरप्रतापशमनं छायाङ्घ्रिमोक्षद्रुमं
वन्दे चक्रधरं प्रवर्य्यपितरं विश्वस्य शिक्षाकरम् ॥३॥
श्रीमच्चक्रधरास्यनिश्रुती वचः पियूष पूर्ण प्रपा । पाथोदः पथि पांथ मंथर परि श्रांतस्य लोकस्य यः । स्फुर्जित् भीमभवाटवी समटतः तं नागदेवं सदा । सारासार विचार सुंदर गिरां पारंगतं नौम्यऽहम् ॥४॥
स्वामिते अभिवंदिती स्मरति जे ध्यानी मनी चिंतिती । दास्या तत्पर सेवकादि भजका सौजन्य मार्गी प्रिति । ते या सर्वही साधका विधिपरा लोटांगणी जाउनि । साष्टांगी अभिवंदनादि लुङतु मी रंक रंकाहुनि ॥५॥देवाच्या चरणी विहार करुनि संबंध जाला जया । सेवेही उपयोग मुख्य सकळा श्रीमूर्ती निष्ठा तया । स्वामी सन्मुख भाउनि प्रतिदिनी वंदी स्तवी सेउनि । एवं साधन पूर्ण साध्य करीते ते ध्यान माझ्या मनी ॥ ६ ॥
आदौ देवकीदेवगर्भजननं गोपिगृहेवर्धनम् । मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणम् । कंसोच्छेदनं कौरवादिहननं कुन्तिसुतापालनम् । एतद्भागवतेपुराणकथितं श्रीकृष्णलिलामृतम् ॥७॥
छंद :- पृथ्वी
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो । कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो । सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो । वियोग घडता रडो, मन भवच्चरित्रि जडो ॥८॥
न निश्चय कधी ढळो, कुजनविघ्नबाधा टळो । न चित्त भजनी चळो, मति सदुक्तमार्गी वळो । स्वतत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो । पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो ||९||
छंद :- शार्दुलविक्रिडीत
चेतोदर्पणमार्जनं भव महा दावाग्नि निर्वापणम् । श्रेयः कैरव चन्द्रिका वितरणं विद्यावधु जीवनम् ॥ आनन्दाब्धि विवर्धनं प्रतिपदे पुर्णामृता स्वादनम् । सर्वात्म स्नपनं सदा विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम् ॥१०॥देवाने मजला पहा घडविल्या नाना परीच्या क्रिया । अज्ञाने परी व्यर्थ म्या दवडिल्या संतोष मानुनिया || आता यत्न करीन मी पुनरपि होउनिया किंकर । मागे हेच तुम्हासि की मज कधी देऊ नका अंतर ॥। ११ ॥
तुम्ही साधक सर्वही सुहृद हो आचारसंपन्न हो । की ज्यांच्या भजनेच प्रेम मजला होईल निष्पन्न हो ॥ माझे सर्वही दोष ते विसरुनी माझी क्रिया स्वीकरा । तुम्ही जै स्वीकराल तोष मग तो होईल त्या ईश्वरा ||१२||
स्वामीराज परायणा मुनिजना शांती असू द्या मना ठेवा स्वस्थपणा बसुनी आसना पंक्तीस घ्या भोजना | आर्ती मंगल धूपदीप सुमना शक्ती यथा दक्षणा । साष्टांगे प्रणिपात हस्त नमुनी घालुनी लोटांगणा ॥ १३॥
प्रेमाने विनवूणी दंडवत हो त्यातत्परा विनवी जो माने पदार्थ तोचि बरवा रुचेल ज्याची चवी वारंवार क्रिया हिनासी न घडे दारिद्र्य दोषामुळे पाहो शुद्ध क्रिया प्रणम्य सकळा प्रारब्ध माझे खुळे ||१४||
दावोनि धुपाआरती करोनिया प्रणम्य पै घालीति घ्यावो ग्रास करा पवित्र तुम्ही हो कैची मला संपत्ती तुम्हा योग्य पदार्थ निष्पत्ती करो नाही असें जोडीलें धुरा ईश्वरीचें समर्थ तुम्ही हो प्रसन्नता जोडीलें. ॥१५॥काष्टा कीटक कोरिता उमटती नानापरी अक्षरे । टाळी वाजविताचि काग गवसे ऐसाही वेळा किरे । आकाशी ढग वानरा कृती दिसे भासे विचित्रा परी । तैसा हा नरदेह दुर्लभ खरा भज कृष्ण नाम हरि ॥ १६ ॥
तारिले भवसागरी बहु तुवा ऐसे पवाडे अच्युता । शेष व्यास शुकादि नारदमुनी ते शिणले वर्णिता । जीवा तारण हेतू सृष्टी रचीली ऐसी कथा कर्णिता । माते येउनि काढिजे निजकरे भवार्णवी बुडता ॥ १७॥
काया हंसविना, नदी जलविना, दाताविना याचका । स्नेहे बंधुविना, तरू फलविना, धेनूच दुग्धाविना ॥ भार्या भर्तुविना, पुरी नृपविना, दीपाविना मंदिरा । पद्मे भानुविना, शशी निशिविना, धर्माविना मानवा ॥१८॥
जीव्हेने सफरी, पतंग नयनी, गंधे वधु षट्पदा । आलापे हरणा विनाश घडला, मातांग स्पर्शी सदा । ऐसे हे गत पंचइंद्रिय सुख, जो नित्य सेवी सदा । नाही उर्ध्व गती भवार्णवी मुढे, तो केवि पावी पदा ।।१९।।
दोषांचा भवदुर्ग थोर प्रसवी माझे असे अंतर । किंतु त्या अनुलक्षुनि मज तुम्ही देऊ नका अंतर । पूर्वार्जित सदुर्बळेच तरिही हा योग आला बरा । सुस्ने स्विकरा तुम्ही सुहृद हो हे मातृकृत्य करा ॥२०॥केले नित्यही वचकत्व जवळी, होता जरी संभव । लोभे आक्रमलो म्हणुनि न घडे, काही क्रिया यास्तवं । आता देवकृपेमुळे घडतसे, माते क्रिया ही पहा । स्वीकारा तुमते करी विनवणी, द्या मान या आग्रहा ॥२१॥
साने थोर असंख्य दोष मम हे आहेत जगजाहीर | पोटी सामावून ते तुम्ही सुहृद हो ना घातले बाहीर । ऐशा या मलीनास आज घडतो आहे विधी अल्पसा । तो स्वीकारून आज पावन करा या राजसा तामसा ॥२२॥
देवाची म्हणण्यास राजकुमरे तुम्ही खरे शोभता । नाही शक्य अभागियास तुमची ती वर्णवे योग्यता । तुम्हाला भजण्या सुयोग पुरला पापी कुवेधास या । रंकाचे हिन हे पदार्थ अवघे स्वीकारूनी सर्व घ्या ॥ २३ ॥