जगतीत नसे बा कोणी, तुजवांचुनि
जगतीत नसे बा कोणी,
तुजवांचुनि मोक्षदानी, प्रेमदानी ॥ धृ० ॥
सन्निधी नागदेवांनी केला प्रसन्न, चक्रपाणी ।
व्यसने सप्त त्यागौनि आग्रहे, प्रेम मागौनि ।
ज्या बळे अनुसरविले२ । स्वदास्य सदा करविले २ ।
दिधले वयन परखाणी ॥१॥ तुजवांचौनि ..
जिसी नाम असे महदंबा, ती जणू जगी जगदंबा २ ।
परमार्ग आधारस्तंभा, उपमिली की त्वा प्रारंभा२ ।
बाईसा प्रेमपद दाता २ | मंडळीकाची अघहंता २ ।
ऋषीजन्म ज्याचे स्वीकरौनि ॥२॥ तुजवांचौनि..
षड्वाक्य आचरणी ज्यांचे, ते साधक अतिदैवाचे, अतिभाग्याचे ।
मज रज न मिळे पायाचे, तिळभरही अशा पुरुषांचे२ ।
जन्म हा वृथाचि गेला । हा प्राणी जिताचि मेला २ ।
जडचेतन कुसंगाने ॥३॥ तुजवांचौनि..
परमार्थ स्वार्थ मज नाही, गुंतलो प्रपंचिक डोही २
योग्यता न जोडे काही, अपराध दिनाचे साही २ ।
तारिता कोण मज आता २ । जयताख्य विनवितो त्राता २ ।
पाही बा नेत्र उघडोनि ॥४॥ तुजवांचौनि..