अथ शांतीबाईसाच्या ओव्या
देवा महाराजा, येथे यावे आज । वर द्यावे मज, चक्रधरा ॥१॥ प्रसन्न होउनि, वर दिला मज । म्हणौनि गुरुराज, वंदीयला ||२|| वस्मत गांवीची, मियाबाई एकी । तिच्या दोघी लेकी, पतिव्रता ॥३॥ मियाबाई साचा, भ्रातार सरला । पुत्र तोही गेला, काळगती ॥४॥ एकाइसे तेही, हातरिती जाली । आणून घातली, तियेपासी ॥५॥ जसमाई बाईसी, काउर लागले । म्हणौनि आव्हेरिले, वरैताने ॥ ६ ॥ कनधन दोन्ही, राजाने हिरतले । तेणे दुःखी जाली, मियाबाई ||७|| गतदुःखास्तव, ग्राम त्येजीयेले । आता नव्हे जाले, राहुनीया ॥ ८ ॥भलेयाची चाड, अंतरी धरिली । हरिखे वाहिली, तिघी जाऊ ॥९॥
एक बांधू पाठीसि, एक बांधू पोटासि । जाऊ गोमतीसी, बुडावया ॥१०॥ म्हणौनि तिघी जणी, चालल्या तेथौनि । पैठणा येऊनि, विचारतात ॥११॥ माय म्हणे लेकीसि, ग्रामांत परियेसि । जाऊ भासेयासि, भेटावया ॥ १२ ॥ भासेयाचे नाव, सारंगपंडित ।
तिघी जाऊ त्वरित, भेटावया ॥ १३ ॥ परस्परे भेटी, जालेयानंतरे । क्षेमाचा उत्तरे, प्रणिपात ॥ १४ ॥ ऐसे हे भोजन, जाले एके दिसी । मागिल वृत्तांत, पांडा पुसे ॥ १५ ॥ मागिल वृत्तांत, अवघा सांगितला । त्याच्या प्रत्या आला, वर्तमान ॥ १६ ॥ मियाबाई म्हणे, आतासी जाईन । आज्ञा लवकरी, द्यावी मज ॥ १७ ॥ तेव्हा त्या बाईचा, हेत लक्षोनीया । द्वारका जावया, आज्ञा दिली ॥१८॥ जर तुम्ही जाता, द्वारके येथोनी । एळापूराहुनी, जावे तुम्ही ॥ १९॥ तेथ एक पुरुष, श्रीदेव राऊळ । सामर्थ्य निर्मळ, पहा तुम्ही ॥२०॥ ऐसा विनयोग सांगुनी तयासि ।तयाच्या शब्दासि, पात्र जाल्या ॥२१॥ तिघी जणी आल्या, एळा त्या पुराला । स्वरूप सुंदरा, भेट जाली ॥२२॥ भेटीचे गोमटे, बहुता परीचे । अनंता सृष्टीचे, दोष नासे ॥२३॥ विहरणाहुनि, आले चक्रपाणि । चतुर्विध दानी, उपविष्ट ||२४|| चरणक्षाळण, जालेयानंतरे ।
पाटसरा आसन, उत्तर गौरा कृष्ण ॥ २५ ॥ तिये अवसरी, आसु फळ काढिले । दृष्टपुत केले, बाबाचिया ॥ २६ ॥ सन्मुख बैसोनि, वेध संचरला । आत्मा निवविला, परमानंदे ॥ २७ ॥ जस्माईबाईचा, जीव होता कष्टी । देवे कृपादृष्टी, सुखी केले ॥२८॥ चरणक्षाळण, बाईसे दिधले भितरी घेतले, जस्माई से ॥ २९ ॥ मग त्या बाईला, पुत्र आठवला । गुणाचा चांगला, काय सांगू ॥३०॥ स्वामी म्हणतात, पुत्र आठवला । दुःखास्तव नरका, जाल तुम्ही ॥३१॥ आता येथोनीया, बीढारासि जावे । सकाळीचि यावे, अवस्वरा ||३२|| प्रातःकाळी आले, चरणा लागले । सन्निधी राहिले, राऊळांच्या ॥३३॥बाबा पुसताति, रात्री का आले । तिही सांगितले, नाही बाबा ||३४|| जस्माई बाईचा, रोग नासोनीया । द्वारका जावया, आज्ञा दिली ||३५|| बाई आता तुम्ही, द्वारावती जावे । जस्माईसी न्यावे, सासुरेया ||३६|| मियाबाई म्हणे, हेच द्वारावती । कृष्ण चक्रवर्ती, भेट जाहली ||३७|| आता मी निभ्रांत, जाईना येथोनी । जस्माईल कोणी, नेईल तेथ ॥ ३८ ॥ तेथ प्रिती नाही, नावडी बहुती । घरीची समस्त, प्रतिकुळे ||३९|| श्रीमुखे सांगती, आता हे जाईल । पढियेती होईल, समस्तासि ॥ ४० ॥ तेव्हा त्या कन्येसि, बोले मियाबाई । जस्माईसा नेई, सासुरेया ॥ ४१ मग एकाइसा, बोले त्या मातेस । मज का धाडीसि, इच्यासंगे ॥४२॥ तुज सन्निधान, देवाचे आवडे । आम्हा नावडे, जन्मवेही ||४३|| सृष्टीचा नायक, बोले त्या बाईसि । तुमच्या मातेसि, सुख देऊ ॥४४॥ तोच तुम्हा तेथ, आनंद होईल । असे ते भासैल, अंतःकरणा ॥ ४५ ॥ तेव्हा दोघी जणी, गेल्या तया गावा ।उच्छावो बरवा,
अतिभावे ॥४६॥
गावीचे ग्रहस्ता, घरीचे समस्ता ।
आवडी वरैता, कार्यास्तव ॥ ४७ ॥
ऐसी आवडती, जाली जमाईसे । मग एकाइसे, काय करी ॥ ४८ ॥ एथ शांताबाईसा, सुखानंद दिला । तेथ तोचि जाला, एकाइसा ॥ ४९ ॥ तैसीचि उठली, देव्हाऱ्या बैसली । वेडी पिसी जाली, म्हणताती ॥५०॥ - जस्माईचे गेले, एकाइसा आले । अंतर निवाले, अविद्येचे ॥ ५१ ॥ देव्हाऱ्यावरौनी, लवकर उठली । तैसीचि चालली, एळापूरा. ॥५२॥ शांतीबाई सासि, बोले गौरा कृष्ण । एकाइसे तेथौनी, येत असे ॥५३॥ शांताबाई म्हणे, एकली ते नए । ऐसी विरोधीताए, बाबाजीसि ॥ ५४ ॥ मग जिए दिवशी, एकाइसे येती । ते दिवसी सांगती, पुन्हा पुन्हा ॥५५॥ माजी लेक रेघ, ओलांडली नाही । आता एत नाही. ऐसे म्हणे ॥ ५६ ॥ तव एकाइसा, एळापुरी आली । सन्मुख देखिली, मातोश्रीनं ॥ ५७ ॥ शांताबाई म्हणे, तू का वो एकली । कोणा संगे आली, माता पुसे ॥५८॥ऐसे दटाउनि, बोले त्या लेकीसि । मी उरोधी देवासि, सांजवेही ॥ ५९ ॥ माझ्यासंगे देवो, आला कृष्णरावो । मी एकली का वो, येई येथ ॥ ६० ॥ ऐसी एकाइसे, सन्निधाना आली । दंडवत घाली, देखोवेखी ॥ ६१ ॥ ऐसे हे चरित्र, जाहले एथौनी । दूसरे चिंतूनि, आइकावे ॥६२॥ बोरी एक झाड, बाबुळी बहुत । सिंपिली त्वरीत, शांताबाई || ६३ || तेव्हा माझा स्वामी, बोले त्या बाईसि । वोलिया वस्त्रासि, नेसा तुम्ही ॥ ६४ ॥ ऐसीही दोनी पक्षे, विधी हा सांगती । स्थावर सिंपवोनी, योग्य जाल्या ॥ ६५ ॥ एथोनी तुमच्या, साताये जन्माचे । चरित जीवाचे, करू आम्ही ॥ ६६ ॥ हे एक वासना, तुळशांची एकी । दुसरे कन्येसि, आस पाहा ॥६७॥ आता येथोनीया, हेत जस्मा से । उदक तुमचे, घेऊ आम्ही ॥ ६८ ॥ बाई तुम्ही कर्म, सृष्टानुसृष्टी केले । येथोनी नासिले, संतासंत ।। ६९ ।। कव्हणी एकी दिवसी, सातनग गांव । तेथीचा अनुभव, दाऊ तुम्हां ॥७०॥ साधा वरदान, ते नाव तुम्हासि ।अभय तियेसि, वरदान ॥ ७१ ॥ ऐसे एळापूरी, चरित्र करूनि । तया ते धाडणे, ऋद्धपूरा ॥ ७२ ॥ बाई आता तुम्ही, ऋद्धपूरा जावे । मधी न राहावे, दोन दीस ॥ ७३ ॥ अविद्येची भेटी, घेऊ नका तुम्ही । एक भिक्षा आम्ही, वारीयेली ॥७४॥ नवेया वस्त्राचा नेम न करावा । मनवा जिंकावा, बहुता परि ।। ७५ ।। श्रीप्रभु बाबाचा, प्रसाद घेयावा । बहुत न घ्यावा, विधीयुक्त ॥ ७६ ॥ शांताबाईसाने, मानून घेतले । मग विनविले, स्वामियासि ॥ ७७ ॥ सारंगपंडिती, एथ पाठविले । तयाचेनि झाले, सौख्य मज ॥७८॥ बाई आता तुम्ही, पैठणासि जावे । तयासि भेटावे, एक वेळ ॥७९॥ परस्परा तुम्हा, गोमटे भेटीचे । ऐसे निमित्ताचे, ज्ञान केले ॥८०॥ तेव्हा त्या बाईने, आज्ञा मागितली । कन्या निरोविली, एकाई से ॥ ८१ ॥ बाई तुमचीया, संभाळु लेकीसि । मग पैठणासि, गेली तेही ॥८२॥ जाऊनि भेटली, सारंग पंडिता । पुढिल वेवस्था आइकावी ॥८३॥माझ्या घरी तुम्ही, भोजन करावे । आणिक न घ्यावे, भिक्षेचे हे ॥ ८४ ॥ देवे भिक्षा मज, विधी निरुपिला । म्हणौनि भिक्षेला, जावे लागे ॥ ८५ ॥ निषेध पाहूनि, भिक्षा मागितली । पाच घरे विहिली, देहावधी ॥ ८६ ॥ शांताबाई भिक्षा, करोनीया आली । थोडी ते घेतली, भिक्षा त्याची ॥८७॥ नवीया वस्त्राची, घडी आणियेली दृष्टपुत केली, पांडेयाने ॥ ८८ ॥ शांताबाई म्हणे, याचे काई काज । नवे वस्त्र मज,वर्जिले ॥८९॥ तेव्हा अर्ध जुन, वस्त्र आणियेले । मग समर्पिले, प्रार्थुनिया ॥ ९० ॥ भजन पूजन, जालीयानंतरे । आज्ञा द्यावी मज, प्रशस्तीने ॥ ९९ ॥ सारंग पंडित, आज्ञा तया दिली । ऋद्धपूरा गेली, पेणोवेणा ॥ ९२ ॥ तेथ सेवादास्य, श्रीप्रभु बाबांचे । शांताबाई साचे, स्वीकरीले ॥ ९३ ॥ किती एक दिसा, शांताबाई सासि । अशक्ती तियेसि, उपन्नली ।। ९४ ।। माय अशक्तीते, सय करी कन्येची । देव तिच्या जीवाची, चिंता करी ॥१५॥ स्वामी एळापुरी, राज्य करीताति ।कन्येसि धाडीति, ऋद्धपूरी ॥९६॥ बाई तुमचीये, मासि निरोप | धाडिला आम्हीच, मनोधर्मे ॥ ९७ ॥ तेव्हा एकाइसे, ऋद्धपूरा गेली । जावोनी भेटली, मातोश्रीला ॥ ९८ ॥ माय म्हणे लेकीसि, तू का वो आलीसि । स्वामीने मजसि, पाठविले ॥ ९९ ॥ कन्या म्हणे आई, काई रूचे तुज । आज्ञा केली मज, बाबाजीने ॥ १०० ॥ शांताबाई म्हणे, माझा स्वामी मज । तोचि व्हावा आज, ऐसे रूचे ॥ १०१ ॥ पाचा क्षेरी रोग, विभाग देहीचा । जीवा प्रपंचाचा, भेद करी ॥ १०२ ॥ ऐसे हे चरित्र, ऋद्धपूरा जाले । कर्तृमत्व केले, परमेश्वरे ॥ १०३ ॥ मग एकाईसे, करूनि तू ध्यासी । अस्ति पैठणासि, आणियेल्या ॥ १०४ ॥ पीठजये तिए, निंबातळी आसन । स्वामी माझा कृष्ण, अवलोकी ॥ १०५ ॥ एकाईसा आली, दण्डवत घाली । चरणा लागली, अनुतापे ॥ १०६ ॥ सन्निधी बैसली, वार्ता आइकिली । देवे स्विकरिली, कर्णद्वयी ॥ १०७ ॥ ऐसे आइकोनी, मग म्हणितले । तियेसि घडले कर्म, प्रमाणोक्त ॥ १०८ ॥ांताबाईसाला, केले पारंगत । तैसे मजप्रति न्यावे आता ॥ १०९ ॥ सत्व आठांतुल, त्याचा अवतार | स्वर्गी आहे चंद्र, तेचि नामे ॥ ११० ॥ स्वामी महाराजा, क्षमा जी करावी । आर्त पूरवावी, राघवाची ॥ १११ ॥ स्वामी चक्रधरा, भेटी द्यावी मज टाकू नका मज, अव्हेरूनि ॥१९२॥ क्षणाक्षणा माये, कृपादृष्टी पाहे । माता बाळ केव्हा, वीसरेना ॥ ११३ ॥ तैसे मी लेकरू, अज्ञान बाळकु । वोवीया कौतुक, संबंधिल्या ॥ ११४ ॥
॥ इति श्रीराघवमुनि रचित ओव्या संपूर्ण ।
*******