ओवाळू आरती तुजला
ओवाळू आरती तुजला श्रीकृष्ण प्रेम द्या मजला ॥धृ॥
तव अगाध अनुपम लीळा, विख्यात असे जगताला ।
वर्णिता शेषही श्रमला,ती म्हणता तुजला ॥१॥
जरी अससील निर्गुण थोर, तुझा युगायुगी अवतार ।
घेतोसि परात्पर, जीवालागी त्रास बा तुजला ॥२॥
कोस द्वादश अग्नी गिळिला, त्वा गोवर्धन उचलिला ।
कंसचाणूर ठारचि केला, ब्रह्मादिक शरण बा तुजला ॥३॥
भारती महायुद्धाला, प्रवृत्त केले पार्थाला ।
बोधुनि गीताशास्त्राला, प्रेमदास वंदितो तुजला ॥४॥
श्रीकृष्ण प्रेम द्या मजला ॥धृ॥