जय नंदकुमारा सुकुमारा
जय नंदकुमारा सुकुमारा
जय नंदकुमारा सुकुमारा ।
भव दोष क्लेष दुःख ताप हरा ॥ धृ ॥
निज कृपे ज्ञान दे उद्धवासी ।
अक्रूर बोधिला गुणरासी ।
द्वारका स्थापिली हृषिकेशी ।
चाल । सुदामजीला सुवर्ण नगरी ।
अर्पूनी राज्य देतो मुरारी ।
क्रीडा करी अनंत । कुमारा सुकुमारा ॥१॥
जगी धन्य करुनी यशोदेला ।
अपूर्व दाखवी बाललीला गोपिका वेधल्या स्वरुपाला ।
चाल । सोळा सहस्त्र
भोगुनी नारी । निर्वकार ब्रह्मचारी वेदा न कळे अंत । कुमारा सुकुमारा ॥ २ ॥
पांचाळ नृपति तनयेचा कैवारी सारथी भक्तांचा ।
संदेह फेडीला पार्थाचा । चाल ।
गीताशास्त्र अपर्व कथुनी योग्य केला ज्ञान देऊनी । वर्णिती लीळा संत ।
कुमारा सुकुमारा ॥३॥
दुर्जने गांजिता पांचाळी | पांडवासी चिंतानळ जाळी ।
वसने पुरविली वनमाळी ।
चाल । देशोदेशीचे
बहुमोलाचे गर्भ रेशमी शालू जरीचे । नेसवी भाग्यवंत कुमारा सुकुमारा ॥४॥
द्वारावतीकारा प्रभुराया । हरिहर वंदिती तव पाया।
शेषही श्रमला गुण गाया । चाल । अल्पमतिचा अर्भक
सुता । बुद्धी द्यावी तण गुण गाता आणू नका मनी खंत । कुमारा सुकुमारा ॥५॥