प्रभात काळी जननी यशोदा
प्रभात काळी जननी यशोदा । उठी उठी बा म्हणे मुकूंदा ।
गोपाळ येती तुजला पाहाती । गोविंद दामोदर नाम घेती ।।1।।
{येती पुढे हे खगगोधनाचे । उभे केले सत्वर केधवाचे ||}
प्रभात काळी सह्यांचळासी । उपहूड झाला प्रभु राऊळासी ।
मुनीवृंद उभे रायांगणाशी । दुदुंभी गर्जे आकाशी ।।2।।
प्रातः समयी श्रीचक्रपाणी । फलस्थग्रामी जनकाई धामी ।
भाइसाचा निज प्रीय त्राता । जीवास चिंती सदा हितकर्ता ।। 311
उशांत काळी प्रभु ऋद्धपुरी । स्वच्छंद लीळा कृपया विहारी ।
नासोनी दुःखे विमला कृमीचे । करी प्राप्त स्वामी अधीकार त्यांचे ।। 4 ।।
पश्यात प्रहरी तो राजविहारी । चंतीत जीवा सदा हितकारी ।
नागांबा प्रश्ने प्रभु थाप चिंती | रुपांबा प्रश्ने तो जीव चिंती ।।5।।
हारुनी बाधा कुळपंचचार्या । वामन पंधी जीव विश्व भार्या ।
श्री मृत्युंजया विनवी पुजारी । नसोनी दुःखे भवरोग हारी ।।6।।