यशोदा म्हणे बा कंसारि
यशोदा म्हणे बा कंसारि ।
ऊठ बा सखया श्रीहरी । । धृ ।।
झररर सूर्य वर आला ।
प्रकाश दाही दिशा पडला।
दारी गोपाल हाका मारी । ऊठ बा सखया ....
भररर पक्षी किती उडति ।
मुखाने कृष्ण कृष्ण म्हणति ।
मोक्षाचा दाता गिरीधारी ।
प्रेमाचा दाता गिरीधारी । ऊठ बा सखया
झणनन वाजतसे वेणू|
ऊठ लवकर श्याम तनू ।
करी बा दहीभाताची नहारी । ऊठ बा सखया ... ।।3।।
किसन म्हणे आठवा गोविंदा |
चुकवी संसृतीचा फंदा |
मोक्षाचा दाता गिरीधारी । ऊठ बा सखया
(कवि किसन: यांचेबाबत मला माहीत नाही. कुणाला माहीति असल्यास आम्हाला कळवावे. माहीति येथे प्रसिद्ध करता येइल. भावे)