मेरुवाळा तटी भोजनता
मेरुवाळा तटी भोजनता रम्य स्थळ जागा ।
आधी आरती करितो मी जेथे आसन श्रीरंगा || धृ ||
मेरुवाळाचे स्नान करुनिया शिंपणे खेळुनि ।
हो भोजन दोही देवांचे तेथे बैसोनि ।
कोल्हापुरची(गंगातिरीची) भिक्षा स्वामी येतो मागुनि
षण्मासापर्यंत तेथे मूर्ती अवस्थानी ।
शेष श्रमला गुण वर्णिता जिव्हा दो भागा ।
आधी आरती करितो मी जेथे ... ।।1।।
जागती ज्योत पुरवी मनोरथ नवस दुरुनि येति ।
खेळणे आनि पाळणे आणुनिया किती एक वाहाति ।
मनोरथ गेले सिद्धी म्हणुनिया देउळ बांधीति ।
निपुत्रिकासि दिधले पुत्र ते मिरवत येति ।
अवसर होति वाद्य वाजति नाद जाति स्वर्गा ।
आधी आरती करितो मी जेथे ... ॥ 2 ।।
निर्धनासि दिधली लक्ष्मी करीति पासोडे ।
पान सुपारी केळी नारळ वाहाति दूधपेढे ।
र्कपुर लवंगा चिकन सुपाÚया आणिक वेलदोडे ।
बत्तीसा पानाचे बांधति देवासाठी विडे ।
उपहार होति बसल्या पंगती आव्हानीति मार्गा ।
आधी आरती करितो मी जेथे ...॥ 3॥
देवाभोवती शीतल सावली निंबा वृक्षाची ।
अखंड यात्रा उतरे तेथे माझ्या स्वामींची ।
चैत्र मासी यात्रा भरते साधुसंतांची ।
रात्रं दिवस होए गर्जना श्रीदत्तनामाची ।
श्रीदत्ताचे नाम उच्चारी नको राहु उगा ।
आधी आरती करितो मी जेथे ... ।। 4 ।।
रिलोप किंकर कर जोडुनिया करितो विनंतीसि ।
स्वामी माझा पुरवी मनोरथ भेट कधी देसि ।
तुजवांचैन नाही सहोदर आहे मी परदेसी ।
तूच माझा मातापिता मज कधी उद्धरीसि ।
आता उशीर नको लावू माझ्या जिवलगा ।
आधी आरती करितो मी जेथे ... ।। 5 ।।