श्रीदत्तराज महाराज गाजतो
श्रीदत्तराज महाराज गाजतो बाजू राख माझी- 2 ।।धृ।।
दर्शन तुमचे होता मजला झाला आनंद ।
दत्तशिखरी राज्य करितो पढताति ब्रीद |
दश्यामस्कंदी स्तुति करिता श्रमले ते वेद ।
दग्ध जीवासि साकार झाला-2 स्तुती करीन तुझी ।
श्रीदत्तराज महाराज गाजतो बाजू ... ।।1।।
तनमन तुमच्या चरणी माझे लागले चित्त ।
तर्क धरी रे प्राण्या अंतरी स्मरावा दत्त ।
तरले तुमच्या नामी ऐसे बोलताति संत ।
तरला अळर्क भक्त निवाला-2 उतरली ओझी ।
श्रीदत्तराज महाराज गाजतो बाजू ... ।।2।।
राहता अवधूत वेष तुमच्या सह्यांचळी थारा ।
रात्रंदिवस ज्ञान दिधले त्या काशीश्वरा ।
रानामध्ये भेट दिधली परशुराम वीरा ।
रानी रेणुका स्थापुनि हरी हा- 2 कोरी भूमीकेसी ।
श्रीदत्तराज महाराज गाजतो बाजू ... ।।3।।
जगपर श्रेष्ठ नाम तुमचे कळले हे मज ।
जरी तुम्ही हाती धराल संकट निवारेल सहज ।
जन्मा येऊन नफा नाही अंतरले मज ।
जय जय भीऊ प्यारा बोले- 2 स्तुती करीन तुझी ।
श्रीदत्तराज महाराज गाजतो बाजू ... ।।4।।