तू श्रीदत्ता झोप घेई आता
घेई झोप प्रभु आता, हालवी अनसूया माता ।
थकले गाणे तुझे गाता, तू श्रीदत्ता झोप घेई आता
झाली रात्र चहुकडे, कुठे ना पक्षी आता उडे ।
आला चंद्र ढगाकडे, पडले तेज चहुकडे ।
चमके नभी तारे, तू श्रीदत्ता झोप घेई आता ॥ १ ॥
तू झोपले मानव हे सारे, करोनि काम धंदा त्वरे ।
सुटले मंदगती वारे, झोपले पशुपक्षी सारे ।
झोपले बाळ स्तन पिता, तू श्रीदत्ता झोप घेई आता ॥२॥
गाति ऋषीमुनी रोज, करोनि पुष्पांची शेज ।
प्रार्थी दास कृष्णराज, करी तव चरणाची खोज ।
दिसेना कुठे मज आता, तू श्रीदत्ता झोप घेई आता ॥ ३