जय जय अवधूत प्रभुराया
जय जय अवधूत प्रभुराया
जय जय अवधूत प्रभुराया । वंदीन तुमचे पाया ॥धृ॥
ऋषीवंशी प्रभु अवतरलासि ।
भक्त तारावया ॥१॥
परमार्गासि आदिगुरु जो ।
तो श्रीदत्तात्रेया ॥ २ ॥
खांद्या कावड पारधी वेष |
त्रिताप जातील विलया ॥ ३ ॥
सहा चार अठरा वर्णीति तुजला ।
श्रमली वेदमाया ॥४॥
कुमरांकित मुनि कृष्ण सुधाकर ।
संतु लागे पाया ॥५॥
जय जय अवधूत प्रभुराया ।
वंदीन तुमचे पाया ॥धृ॥