धूपदीप चंदन सुगंध दाउनि
धूपदीप चंदन सुगंध दाउनि ओवाळितो तुजला ।
आरती द्वारावतीकारा, आरती द्वारावतीकारा ॥धृ॥
जनकाइसाचे भाग्य आगळे, परब्रह्म हे उदरी आले ।
फलस्थपूरत्या पवित्र धामी, प्रकटसि तू चित्परा ||१|
सर्वस्वाचा त्याग करोनि मातापुरी त्या पवित्र स्थानी ।
श्रीदत्तात्रेयप्रभुंपासुनि, करी शक्ती स्वीकार ॥२॥
मातापुराहुनि गमन सारिले, द्वारावती येउनि राहिले ।
क्रीडा करुनि निशीदिनी केले, जीवांचा उद्धार ॥३॥
द्वारावतीला क्रीडे जगदानी, राज्य करितो श्रीचक्रपाणि ।
विद्यादान बावन पुरुषासि, करी स्वामी दातार ॥४॥
कार्र संपता अवताराचे, निमित्त मानुनि कामाख्याचे ।
पतित उठवी हरिपाळाचे, भरवसपूरनगरा ॥५॥
अशा करोनि अनंत लीळा, जीव उद्धरीसि स्वामी दयाळा ।
दासी मालती तव पदकमला, वंदितसे ईश्वरा ॥ ६ ॥