श्री आबासाहेबा बाबासाहेबा
श्री आबासाहेबा बाबासाहेबा मंगल आरती स्वीकारा ।
ही मंगल आरती स्वीकारा ॥धृ॥
सह्यगिरीच्या शिखरावरती दोही देवाचे स्थान ।
पंचक्रोशीतील भक्त सांगति परंपरेचा मान ॥ १ ॥
अव्यक्तीहूनि प्रवृत्ती झाली अवतार धरण्याची ।
दीन पतित अनाथ जीवाचा उद्धार करण्याची ॥२॥
फलस्थपुरीहूनि त्याग करूनि आला तो अवतार ।
नाम तयाचे श्रीचक्रपाणि नेई जीवा भवपार ॥३॥
पवित्र स्थानी वंदन करिता रजतम विलया जाति ।
संकट टळते मनोरथ पुरति नवसही पूर्ण होति ॥४॥
माघ महिना महाशिवरात्री यात्रा भरते मोठी ।
चतुर्विध साधन मिळाले भक्तजनाची दाटी ॥५॥
परमार्गाचे साधक येति अनुष्ठान करण्यासि ।
माहुरदर्शन घेउनि हृदयी श्रीदत्त स्मरण्यासि ॥ ६ ॥
- दीनदयाळा विनंती करितो तुजला विनम्र भावे ।
प्रेमपद मज देउनि देवा निजप्राप्तीला न्यावे ॥७॥