जय जय गोविंद जय प्रभुराज
जय जय गोविंद जय प्रभुराज.. २
आरती करितो तुम्हा मी आज ॥धृ॥
अनंतनायक नेमाइसा कुशी नटुनि मातुलग्रामी ।
ऋद्धपुरासि अखंड विचरसि
गुंडम योगीराज ॥ १ ॥
निर्गुण ब्रह्म परात्पर रूपा
अगाध तव गुण महिमा |
आर्यवेष नट धारण करुनि
पुरवी जनाची काज ॥२॥
साठ जीवांची मूळ अविद्या प्रतिदिनी तू छेदुनिया ।
ब्रह्मपदी पाठवी कृमीला लीळा करुनि सुरराज ॥३॥
अनिमित्त बंधू तू आर्तदानी
परमानंद सुखदाता |
विनम्र भावे चरणी शरण हो
आलो तुम्हा मी आज ॥४॥
जयतु मंगला परम मंगला
देवा मंगलरूपा ।
दामोदर तुज आरती ओवाळी
राख सख्या मम लाज ॥५॥