आरती ब्रह्मरूपा
आरती ब्रह्मरूपा, श्रीचक्रधर स्वरूपा ॥धृ॥
तुझे लागू दे ध्यान करोनि स्थिर मन ।
हृदयी साठवू दे परमानंद रूपा ॥१॥
ज्ञान प्रेमासि दिधले जीवासि उद्धरिले ।
कैवल्यसुख दिधले येथेच केली कृपा ॥२॥
देवादिकासि न कळे मायेचे झाके डोळे ।
तेथे मानव भोळे पाहाति पररूपा ॥३॥
नागदेवा स्थापुनि करी रूपासमान ।
प्रकटे ब्रह्मज्ञान जगजेठी अमुपा ॥४॥
दास चरणी लोळे ठेवोनि निजभाळ |
मागणे हेचि देवा, देई शुद्ध स्वरूपा ॥५॥
आरती ब्रह्मरूपा, श्रीचक्रधर स्वरूपा ॥धृ॥