श्रीचक्रधरा स्वामीराया आरती तुज ओवाळितो
श्रीचक्रधरा स्वामीराया आरती तुज ओवाळितो ।
पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो ।। धृ ।।
गंध टीळा सर्व भावे भाळी ऊध्र्व रेखिला ।
श्रीफळासह पान पोफळ चित्त विडा वाहिला ।
वाक्पुष्पी हार गुंफून शुद्ध भावे अर्पितो ।
पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो. ॥ 1 ॥
अनंता हे कृपाळा हे प्रभु करुणाकरा ।
तूच माझा मायपिता तूच बंधु सायरा ।
ज्ञान देउनि प्रेम देई हेचि आता मागतो ।
पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो ... ।।2।।
सृष्टीचक्र हिंडता हिंडता जीव सारे भागले ।
त जीवा उद्धारण्याचे व्यसन तुज रे लागले ।
वेळोवेळी अवतरौनि तूच रे प्रतिपाळितो ।
पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो ... ।।3।।
नाही आवडी नाही गोडी नाही केले पूजन ।
नाही आठवण नाही सिमरन नाही केले चिंतन |
पश्चात्ताप होई आता अश्रु कोरडे ढाळितो ।
पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो ...॥ 4 ॥