जय नमो विघ्नमर्दना
जय नमो विघ्नमर्दना कनाशी राजा ।
कर जोडुनिया प्रणिपात करी मम काजा ॥धृ॥
श्रीपती पूर्ण भगवान मही अवतरले ।
मुनिवेष धरूनि जीवहेतु वाघली आले ।
तव पुढा मार्गी चालता जनी देखिले ।
अनुपम्य मूर्ती पाहून मन विस्मित झाले ।
त्या मला नांदणी आसनी निश्चल ठेले ।
निजकिंकर वेष्ठित अवलोकित भवताले ।
श्री नगर कनाशी अपूर्व कलले द्विजा ।
तो सत्वर येउलि विनवितो महाराजा ॥2॥
जयं द्विजराज प्रभूला घेउनि आले सदना ।
मर्दना स्नान करी वस्त्र भूयगे नाना ।।
लल्हाटी चंदन कस्तुरी तिलक जागा ।
सर्वागीं चर्चनि उटी जानवी पवना ।
दे षडरस भोजन पुष्पशेज करी शयना ।
बहु सुवास कर्पूर विडा रंगला वदना ।
अर्चना करून मग जोडी द्वय करकंजा ||
मी अनाथ स्वामी पूर्ण हेत करी माझा || 2 ||
विप्रासि प्रसत्र हाउनि मागा म्हणति
तव दृष्टचि मागे वेवन्याय मग वदति
पहा अपूर्व ओटा चहुं देशामध्ये कीर्ति
किनखापी गलफ उपकरणे शोभति
भरजरी चांदवा तकया लोट गादी
वर शहामृगाची अंडी शोभा देती
उद कापुर आरती त्रिकाल गरुडध्वजा
घनघोर घडयाले मृदंग नौबत बाजा (3)
जब शुद्ध चैत्रमास पौर्णिमेस यात्रा भरती
घनदाट थाटले अपार अवसर होति ।
होति झांगड वाद्य महंत मिरवत येति ।
यंत्राचे सुटति तड़क धडक बहु होति ।
हत्ती गाड़े घोड़े पुत्र मनोदय पुरति ।
नासुनी महारोग दोष लागती पंथी नित,
जलतो नंदादीप होतसे पूजा गोविन्द बाल प्रार्थितो नाशी भवबीजा (4)