जयतु मंगलमय पूरधार्या
जयतु मंगलमय पूरधार्या, जीवउद्धारण कार्य कराया।
तुजविण न च प्रभुराया । जयतु मंगलमय पूरधार्या ॥धृ॥
गुर्जर देशी भरवस नगरी प्रकटुनि तू हृषीकेशी ।
निजस्वरूपाची दावुनि माया भवभय दूर करीसि ।
अष्टभोग परिपूर्ण असुनि त्यजियले त्या सुखठाया ॥1॥
जयतु मंगलमय पूरधार्या...
विदर्भदेशी ऋद्धपूर काशी येउनि श्रीप्रभुपासी ।
उभय शक्तीचा स्वीकार करुनि सालबर्डी ससेयासि ।
सुखानंद देउनि तयासि अजरामर करी काया ॥2॥
जयतु मंगलमय पूरधार्या...
भिल्ल गोंडाच्या जाउनि नगरी पतित जीवासि तारी ।
यतिमुनिचा वेष धरुनि भिक्षाभोजन सारी ।
भांडारेकार निलंभट्टासि ज्ञानापूनि धरी छाया ॥3॥
जयतु मंगलमय पूरधार्या...
आंध्रप्रदेशी हासूबाईसी दिधले प्रेमसुखासि ।
योग्य करूनि नागुवाईसी दिधले प्रेमपदासि ॥4॥
तैसेच तुमचे प्रेमचि मजला द्या श्रीचक्रधर राया ||4||
जयतु मंगलमय पूरधार्या...
व्यसनभूत श्रीचक्रधरराया गंगातीर प्रांती या ।
क्रीडा करी जीवहेतु धरूनि भूमिका पूत कराया।
नागदेवासि करुनि आचार्या असतिपरी आचराया ॥5॥
जयतु मंगलमय पूरधार्या...
डोमेग्रामी श्री चक्रधरस्वामी क्रीडा करी निष्कामी ।
म्हाइंभटासि बोध करूनि दूर करी त्यांची उर्मीीं ।
अगणित नेले जीवन निजधामी रविभिद लागे पाया ॥6॥
जयतु मंगलमय पूरधार्या...