नमो पंच अवतार करा हो आरोगणा स्वीकार
नमो पंच अवतार करा हो आरोगणा स्वीकार ॥धृ॥
मज गरीबाचे रूक्ष कदन्न ।
गोड करावे होउनि प्रसन्न ।
दाखवितो उपहार,
करा हो आरोगणा स्वीकार ॥ १ ॥
कृपादृष्टीने अवलोकुनि ।
उच्छिष्ट आपुला प्रसाद देउनि ।
घडवावा अधिकार,
करा हो आरोगणा स्वीकार ॥२॥
अनंत जन्माचा अपराधी । अशुद्ध माझी क्रिया ही साधी
नका करू धिक्कार,
करा हो आरोगणा स्वीकार ॥३॥
पतितपावन हे दीननाथा ।
पावन करुनि घ्यावे अनंता ।
आहे तुझा गुन्हेगार,
करा हो आरोगणा स्वीकार ॥४॥
दामोदर हा सेवक आपुला । विनंती करितो पदकमलाला । नमितो मी वारंवार,
करा हो आरोगणा स्वीकार ॥५॥
नमो पंच अवतार
करा हो आरोगणा स्वीकार ॥धृ