हीन दीन मी मज गरिबाची
हीन दीन मी मज गरिबाची, आरोगणा करी तू प्रभुजी ॥धृ॥
बाइसाचा पाणीभात आवडीने जेवी तू प्रभुजी ॥१॥
आबाइसाचा उपहार स्वीकरिला त्यापरी स्वीकरी तू ॥२॥
निळंभटासि प्रसाद दिधला त्यापरी मज देई तू ॥३॥
वंचकादि बहु दोष अर्जिले विसरूनि दोषा तू ॥४॥
शशीबंधु हा दास विनवी
हृदयासि मज धरी तू ॥५॥
हीन दीन मी मज गरिबाची, आरोगणा करी तू प्रभुजी ॥धृ॥