पंचअवतार तुम्ही आरोगणेला
पंचअवतार तुम्ही आरोगणेला ।
बीजे करावे मम सदनाला ॥धृ॥
मी दीन दुर्बळ दास तुमचा हो ।
पावन करावे मज पतिता हो ।
विनंती माझी तुम्ही अंगिकरावी ।
आरोगणा मम नित स्वीकरावी ।
प्रसन्न होडनि मज प्रसाद द्यावा ।
अशुद्ध जीव मम शुद्ध करावा ।
आबाकुमर क्षिती भावी मनाला ।
येईल दैव कधी मम उदयाला ।
आबाकुमर क्षिती भावी मनाला ।
प्रेमदान द्या मज गरीबाला ॥० ॥
पंचअवतार तुम्ही आरोगणेला ।
बीजे करावे मम सदनाला ॥धृ॥