भक्ती मुक्ती सुखदायक देवा
भक्ती मुक्ती सुखदायक देवा, जय नमो पंचअवतारा
तुम्ही आरोगणा स्वीकारा, हो तुम्ही आरोगणा स्वीकारा ॥धृ
विदुरकण्यांचे भोजन केले मोठ्या प्रेमभराने ।
सुदाम पोहे आणि द्रौपदीची भाजी ती आवडीने ।
सेवन केले त्यासम आता श्रीकृष्णा अवतारा ॥१॥
राणी मदळसा नित्यदिनी घरी भिक्षा मागुनि येसि ।
आत्मऋषीची विनंती मानुनि दैनिक भोजनकरीसि
तसेच आमुच्या रूक्षान्नाची श्रीदत्तात्रेय अवतारा २
सहस्त्रभोजन विप्राचे परिपूर्णपणे स्वीकारिले ।
आणिक द्विजाचे श्राद्ध जेउनि त्यांचे पूर्वज उद्धरिले
कृपा करुनि त्यासम आता श्रीचक्रपाणि अवतारा ॥ ३॥
आबाइसाच्या गोड पुऱ्या तुम्ही आरोगिल्या प्रेमाने
तिकोपाध्याचे भोजन केले त्यांच्या घरी जाऊनि ।
तसेच आमुचे निर्गुण ब्रह्मा श्रीगोविंदप्रभु अवतारा
पाणीभात हा रूक्ष तरीपण स्वीकारिला बाइसाचा
बोणेबाइचा उपहार प्रतिदिनी अंगिकरिला त्यांचा ।
कृपा करुनि त्यासम देवा श्रीचक्रधर अवतारा ॥५॥
भक्ती मुक्ती सुखदायक देवा, जय नमो पंचअवतारा ।
तुम्ही आरोगणा स्वीकारा,