प्रातकाल प्रार्थना
प्रभात काळी जननी यशोदा ।
उठी उठी बा म्हणे मुकुंदा ।
येति पुढे हे खग गोधनाचे ।
उभे केले सत्वर केधवाचे ।
गोपाळ येति तुजला बहाति ।
गोविंद दामोदर नाम घेति ॥१॥
प्रभात काळी सह्याचळासि ।
उपहुड़ झाला प्रभु राउळासि ।
मुनिवृंद उभे रायांगणासि ।
सुरवर दुंदुभी गर्जे आकाशी ॥२॥
प्रातः समयी श्रीचक्रपाणि ।
फलस्थ ग्रामी जनकाई धामी ।
रंभाइसाचा निजप्रिय ताता ।
जिवास चिंती सदा हितकर्ता ॥ ३ ॥
उषांतकाळी प्रभु रिद्धपुरी ।
स्वच्छंदलीळा कृपया विहारी ।
नासौनि दुःखे विमळा कृमीचे !
करी प्राप्त स्वामी अधिकार त्यांचे ॥४॥
पश्चात प्रहरी तो राजविहारी ।
चिंतित जिवा सदा हितकारी ।
नागांबा प्रश्ने प्रभु थाप चिंती ।
रुपांबा प्रश्ने प्रभु जीव चिंती ॥५॥
हारौनि बाधा कुळपंचचार्या ।
वामनपेंधी जिववी सुभार्या ।
श्रीमृत्युंजया विनवी पुजारी ।
नासौनि दुःखे भवरोग हारी ॥ ६ ॥