मध्यान्ह काल प्रार्थना
पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्यान्ह काळी प्रभु ।
नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभु ॥
सायंकाळ प्रवर्तता गत करी मातापुरी पहुड हो ।
ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्ट्यंतरी नित्य हो ॥१॥
मध्यान्ह काळी क्षेत्र पांचाळपुरी ।
नित्यानी येतो प्रभु रवी स्थिर काळी ।
जय जय शब्दी दुंदुभी गर्जे निराळी ।
प्रसन्न दृष्टी प्रभु संत मेळी ॥२॥