सायंकाल प्रार्थना
मला वाटते ऋद्धपुरासि जावे । प्रभु चरणी मस्तक हे ठेवावे ।
तृषा लागली स्वामीचे तीर्थ घ्यावे । लडीवाळ मी मागतो प्रेम द्यावे ॥१॥
महाद्वारी उभे श्रीप्रभु चरणचारी । क्रीडे राजमठी त्रिपुरुषी आवारी ।
विचारु चिरा उखळी गुढयासी । नमस्कार माझा जडा चेतनासि ||२||
चिरेबंदी वाडा प्रभु राउळांचा । महाद्वारी थाट चहु साधनांचा ।
सखा नांदतो देव भक्तीजनांचा । नमस्कार साष्टांग या सेवकाचा ॥३॥