प्रार्थना श्लोक
जय जय दनुजारी देवदेवा मुरारी ।
तुजविण भवसागरी कवण दासासि तारी ।
निशिदिनी बत मारी पावलो दंडभारी ।
शरण चरण शौरी दैन्य माझे निवारी ॥४॥
तुजविण मज देवा रक्षिता कवण आहे ।
सकळ जन विसावा बंधु तू बापमाये ।
कवण गत करीसि कवण ठायासि सि ।
जय जय हृषिकेशी शिणलो गर्भवासी ॥५॥
वंदौनिया तव पदांबुज देवराया ।
वैराग्य भक्ती मज द्या प्रभु देवराया ।
ज्या साधना घडविले महादेवराया ।
ते प्रेमसाधन घडो मग देवराया ||
कारुण्यसिंधु कृपया पर मायबापा ।
का बा उदास मजसि धरिले प्रकोपा ॥
संसार दारुण वनी मज सांडुनिया ।
गेलासि पै परमनिष्ठुर होउनिया ॥